koyana dam water storage sakal
महाराष्ट्र बातम्या

Koyna Dam Water : कोयना धरणातील घटत्या पाणीसाठ्यामुळे महानिर्मिती चिंतेत!

लांबलेल्या सरीमुळे आता वीजनिर्मिती करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी होत असल्याचे चित्र आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - लांबलेल्या सरीमुळे आता वीजनिर्मिती करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी होत असल्याचे चित्र आहे. एरवी ऑगस्ट महिन्याच्या मध्यावर ओसंडून वाहणारे कोयना धरणांतील पाणीपातळी ओसरत असल्याचा फटका आता महानिर्मिती या वीजनिर्मिती करणाऱ्या कंपनीला बसतो आहे. लांबलेल्या पावसामुळे आणि धरणातील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे पुढील वर्षभराच्या वीजनिर्मितीचे नियोजन करायचे कसे करावे हा प्रश्न महानिर्मितीला पडला आहे.

कोयना धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १०५ टीएमसी आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर महानिर्मितीला वर्षभराच्या वीजनिर्मितीचे नियोजन करता येते. मात्र यंदा पावसाळा लांबल्याने सप्टेंबरचा पहिला आठवडा संपत आला तरी अद्याप धरण भरलेले नाही. मागील वर्षी याच कालावधीत धरणात ९९ टीएमसी एवढे पाणी होते.

कोयना प्रकल्पाची वीजनिर्मिती क्षमता १९६० मेगावॅट एवढी आहे. सध्या महानिर्मितीकडून १०००-११०० मेगावॅट एवढी वीजनिर्मिती केली जात आहे. कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास एकूण पाण्याच्या ६५ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरता येते.

तर धरणातील एकूण साठ्यापैकी सुमारे २० टीएमसी पाणी डेडस्टॉक म्हणून ठेवावे लागते. त्यामुळे हीच परिस्थिती कायम राहिल्यास उन्हाळ्यात कोयना वीज प्रकल्पातून वीजनिर्मिती करणे कठीण होणार असल्याने अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT