Teacher esakal
महाराष्ट्र बातम्या

Teacher : राज्यात शिक्षकांच्या १०,२१३ जागा रिक्त

राज्यात शिक्षकांच्या तब्बल १०,२१३ पदे रिक्त असल्याचा धक्कादायक अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाच्या उपसमितीने सरकार आणि राज्यपालांना सादर केला आहे.

संजय मिस्कीन

राज्यात शिक्षकांच्या तब्बल १०,२१३ पदे रिक्त असल्याचा धक्कादायक अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाच्या उपसमितीने सरकार आणि राज्यपालांना सादर केला आहे.

मुंबई - राज्यातील १० अकृषिक विद्यापीठे आणि १,१७७ महाविद्यालयांत मागील आठ वर्षांपासून शिक्षक पदभरतीत विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब, क, ड), विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल या नमूद प्रवर्गातील तब्बल १०,२१३ पदे रिक्त असल्याचा धक्कादायक अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाच्या उपसमितीने सरकार आणि राज्यपालांना सादर केला आहे.

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या उपसमितीकडून १ ऑगस्ट २०१७ अखेरची विद्यार्थी संख्या ग्राह्य धरुन महाराष्ट्रातील १० अकृषिक विद्यापीठांतर्गत एकूण १,१७७ महाविद्यालयांतील ३४,४३९ पदे मंजूर असून या पदांपैकी १०,२१३ पदे रिक्त असल्याचा अहवाल दिला आहे. हा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने राज्यपालांसह सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडे साद करून या रिक्त पदभरतीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची शिफारस केली आहे.

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद हरिबा काळे व प्रा. डॉ. श्रीमती नीलिमा सरप (लखाडे) यांच्या उपसमितीने हा अहवाल तयार केला आहे. राज्य सरकारच्या ११ एप्रिल २०२२ च्या आदेशानुसार विद्यापीठ परिसर, संस्था अथवा महाविद्यालय एकक मानून १० अकृषिक विद्यापीठे व १,१७७ महाविद्यालयातील शिक्षक पदभरती विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब, क, ड), विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल या नमूद प्रवर्गातील अनुशेषाबाबत आढावा घेतला.

मागासवर्ग आयोगाच्या बैठकीमध्ये अकृषिक विद्यापीठे व अशासकीय महाविद्यालयांतील १ ऑक्टोबर २०१७ ची विद्यार्थी संख्या ग्राह्य धरुन मंजूर शिक्षकीय रिक्त पदांमध्ये विजा(अ), भज (ब,क,ड), विमाप्र, इमाव व आर्थिक दुर्बल संवर्गाचा आढावा घेण्याबाबत उपसमिती गठित केली होती.

दहा विद्यापीठांमध्ये क्षेत्र पाहणी

उपसमितीने दहा विद्यापीठांमध्ये सुनावणी व क्षेत्र पाहणी केली. संबंधित विद्यापीठाचे आरक्षण कक्ष, सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष व विभागीय सहसंचालक यांच्याकडून प्रमाणित माहिती घेतल्यानंतर उपसमितीने अहवाल तयार केला. तो राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी स्वीकारला असून संबंधित संवर्गातील पदभरतीचा अनुशेष दूर करण्यासाठी विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल, मुख्य सचिव यांच्याकडे सादर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT