Adhar Card  esakal
महाराष्ट्र बातम्या

Teacher : राज्यातील १३ हजार शिक्षक ठरणार अतिरिक्त?

राज्यातील शाळांनी अद्याप तीन लाख ९२ हजार ३१५ विद्यार्थ्यांची आधार माहिती स्टुडंट्स (विद्यार्थी प्रणाली) पोर्टलवर नोंदविली नाही.

संजय जगताप

राज्यातील शाळांनी अद्याप तीन लाख ९२ हजार ३१५ विद्यार्थ्यांची आधार माहिती स्टुडंट्स (विद्यार्थी प्रणाली) पोर्टलवर नोंदविली नाही.

मायणी - राज्यातील शाळांनी अद्याप तीन लाख ९२ हजार ३१५ विद्यार्थ्यांची आधार माहिती स्टुडंट्स (विद्यार्थी प्रणाली) पोर्टलवर नोंदविली नाही. त्यामुळे ते विद्यार्थी बोगस असल्याचे गृहीत धरून संच मान्यतेत किमान १३ हजार शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. आधार नोंदणी व यूआयडीएआयकडून वैध करून घेण्याची मुदत उद्या (रविवारी) संपत आहे. त्यामुळे शिक्षण विभागात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या शासकीय, खासगी, तसेच समाजकल्याण, आदिवासी विकास विभाग, अपंग आयुक्तालयामार्फत चालवल्या जात असलेल्या शाळांमधून सुमारे दोन कोटी १३ लाख ८५ हजार ५४९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांची आधार नोंदणी स्टुडंट पोर्टलवर करणे शाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. जेवढ्या विद्यार्थ्यांची नोंदविलेली आधार माहिती यूआयडीएआयकडून वैध ठरेल.

तेवढेच विद्यार्थी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. तेवढ्याच विद्यार्थी संख्येवर शिक्षक संच मान्यता दिली जाणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडून ३० एप्रिलची मुदत देण्यात आली होती, तरीही सुमारे चार लाख विद्यार्थ्यांची आधार माहिती अद्याप नोंदवली गेली नाही. त्यामुळे शासन धोरणानुसार किमान ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अशी आकडेमोड केल्यास किमान १३ हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, शिक्षण संचालकांपासून ते शिक्षणाधिकारी व छोट्या छोट्या संस्था चालकांनीही वारंवार आधार माहिती अपडेट करण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र, माहिती भरताना वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणी, बंद पडणारी वेबसाइट, अनेक शाळांकडे उपलब्ध असणाऱ्या तोकड्या सोयीसुविधा, नेटवर्कची समस्या आदी अनेक कारणांनी अद्याप लाखो मुलांचे आधार नोंदविता आले नाहीत. अनेक विद्यार्थी पालकांबरोबर स्थलांतरित झाले आहेत. त्यांची आधार उपलब्ध नाहीत.

अशी आहे स्थिती

  • २,१३,८५,५४९ - शिक्षण घेणारे एकूण विद्यार्थी

  • ३,९२,३१५ - आधार माहिती नोंदवली नसलेले

  • १,८९,२६,६६३ - आधार कार्डची माहिती पडताळणीसाठी यूआयडीएआयकडे पाठविलेली विद्यार्थी संख्या

  • २७,२०,२४४ - यूआयडीएआयकडून अवैध ठरलेली आधार माहिती

अनेक तांत्रिक अडचणीमुळे राज्यातील विद्यार्थी आधार नोंदणीचे काम पूर्ण झालेले नाही. शिक्षण विभागाने त्यासाठी मुदतवाढ देणे आवश्यक आहे.

- दिलीप आवारे, अध्यक्ष, डीएड पदवीधर, कला, क्रीडा शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT