राज्याचे कृषिमंत्री आणि शिंदे गटाचे समर्थक अब्दुल सत्तार यांनी आता एक गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडामुळे मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक शिंदे गटात गेले आहेत. आता आणखी पाच आमदार आणि तीन खासदार शिंदे गटात जाणार असल्याचा दावा सत्तारांनी केला आहे.
काल अब्दुल सत्तार परभणीमध्ये होते. तिथे बोलताना सत्तार यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे. सत्तार उद्धव ठाकरेंवर टीका करत होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, आम्ही ४० आमदार आणखी दहा, त्यात आता अजून पाच आमदार येणार आहेत. आधी १० खासदार, मग १२ झाले आता १३...आणखी दोन तीन अजून येणार आहेत. तरी हे लोक असली नकली म्हणत बसलेत. मग हे येणारे वेडे आहेत का?
उद्धव ठाकरेंवर टीका करताना अब्दुल सत्तार पुढे म्हणाले की, हे कशामुळे झालं, घरात बसल्यामुळेच झालं. आता गल्ली बोळात फिरतायत. आधीच फिरले असते तर ही वेळ आली असती का? मुख्यमंत्रीपद छोटं नाही. ते किती मोठं, किती शक्तिशाली असतं, याचा अंदाज मी लावू शकतो. ज्यावेळी सत्तेत होता, तेव्हा तुम्ही काही दिलं नाही. आता काय देणार? तुमची सत्ता येण्याचं स्वप्न दहा जन्मातही पूर्ण होणार नाही.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.