CM शिंदे - मुकेश अंबानी भेट; रात्री उशिरा बंद दाराआड तासभर चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath shinde Mukesh Ambani
CM शिंदे - मुकेश अंबानी भेट; रात्री उशिरा बंद दाराआड तासभर चर्चा

CM शिंदे - मुकेश अंबानी भेट; रात्री उशिरा बंद दाराआड तासभर चर्चा

रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, उद्योगपती मुकेश अंबानी यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. दोघांमध्येही बंद दाराआड जवळपास तासभर चर्चा झाली. या भेटीच्या वेळी मुकेश अंबानींचे पुत्र अनंत अंबानी आणि शिंदे गटाचे नेते किरण पावस्कर हेही उपस्थित होते.

हेही वाचा: Guardian Minister: शिंदे सरकारमध्ये फडणवीसच 'किंग'; तब्बल सहा जिल्ह्याचं पालकत्व

या भेटीमध्ये काय चर्चा झाली, हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. यापूर्वी बुधवारी जगातले दुसऱ्या क्रमांकाचे अब्जाधीश असलेले उद्योगपती गौतम अदानी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्या पाठोपाठ आता अंबानी शिंदे भेट झाल्याने आता चर्चांना उधाण आलं आहे. काल रात्री उशिरा ही भेट झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. या सगळ्याला हातातून निसटलेल्या मोठ्या प्रकल्पांची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे या भेटी महत्त्वाच्या आहेत.

हेही वाचा: दसरा मेळाव्यात शिंदे पुत्राला मिळणार मोठी जबाबदारी? आदित्य ठाकरेंना थेट आव्हान

कोणताही नवीन प्रकल्प महाराष्ट्रात उभारायचा असेल तर विविध परवानग्या, व्यावसायिक कारणांसाठी उद्योगपती मुख्यमंत्र्यांची भेट घेणं साहजिक आहे. त्यामुळे ही भेट व्यावसायिक असल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वी गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबानी यांच्या घरी गेले होते. तिथे त्यांनी अंबानी यांच्या घरच्या गणेशाचं दर्शनही घेतलं.