students 
महाराष्ट्र बातम्या

नववी आणि अकरावीच्या मुल्यमापनाबाबत सूचना जाहीर; 30 लाख विद्यार्थ्यांना वर्गोन्नती 

सकाळवृत्तसेवा

पुणे : इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच जाहीर केला. मात्र, या वर्गोन्नतीसाठी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये या इयत्तांमधील विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुणांकन देण्याचा निर्णय घ्यावा. मात्र, असे करताना या सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचे बंधन शाळांवर असणार आहे, असा आदेश शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यातील इयत्ता नववी आणि अकरावीच्या जवळपास ३० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना वर्गोन्नती मिळणार आहे. 

इयत्ता नववी आणि अकरावीमधील विद्यार्थ्यांचे शाळेने आयोजित केलेल्या चाचण्या, प्रात्यक्षिके, अंतर्गत मूल्यमापनातील अथवा विद्यार्थ्यांना विषयनिहाय चाचण्या, ट्युटोरियल घरी सोडविण्यास देऊन, किंवा कोणत्याही सोयीच्या मूल्यमापन तंत्राचा वापर करून त्याआधारे विद्यार्थ्यांना गुणांकन देण्याचा निर्णय शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर घेण्यात यावा. या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर वेगळ्या सत्र नोंदी न करता मूल्यमापन साधनांमधील विषयनिहाय प्राप्त गुणांचा उल्लेख करून प्रचलित पद्धतीने गुणपत्रक तयार करावे, असे शिक्षण विभागाने सांगितले आहे. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याच्या निर्णयाचा लाभ पुण्यातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांना होण्याची शक्यता आहे.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास करता येत नाही. तर नववीचे विद्यार्थी नापास होत असल्यास त्याची पुन्हा परीक्षा घेता येते. परंतु, बहुतांश शाळा दहावीचा शाळेचा निकाल चांगला लागावा, यासाठी अभ्यासक्रमात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना नापासचा शेरा देतात. तसेच अकरावीलादेखील नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने जास्त आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे यावर्षी नववीच्या विद्यार्थ्यांना दहावीला आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना बारावीच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये इयत्ता नववीच्या १७ लाख ९७ हजार ६५५, तर अकरावीच्या १३ लाख २२ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्येही साधारणपणे एवढ्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचा अंदाज आहे. आता या विद्यार्थ्यांचा पुढील वर्गात प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, अद्यापही काही कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला नाही. अशा विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन पूर्ण झाले नसताना त्यांना वर्गोन्नती देताना गुणांकन कसे द्यायचे, असा प्रश्न शिक्षकांसमोर उभा राहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT