महाराष्ट्र बातम्या

Cartridge in Nagpur: खळबळजनक ! हिवाळी अधिवेशन सुरु असताना नागपुरात आढळली १५७ जिवंत काडतुसं, ATSकडून तपास सुरु

नागपूर शहरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना 'एसएलआर' बंदुकीत वापरण्यात येण १५७ "जिवंत काडतुसे आढळल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली.

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Assembly Winter Session: नागपूर शहरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना नवीन काटोल नाक्याजवळील गोरेवाडा जंगल परिसरात शनिवारी (ता. ९) दुपारी १२ वाजताच्या सुमारास 'एसएलआर' बंदुकीत वापरण्यात येण १५७ "जिवंत काडतुसे आढळल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. हा प्रकार उघडकीस आल्यावर एटीएससह राज्यातील सर्व सुरक्षा यंत्रणा जाग्या झाल्या आहेत.

शहरात हिवाळी अधिवेशनासाठी संपूर्ण मंत्रिमंडळासह आमदार नागपुरात आहेत. त्यामुळे पोलिसांकडून सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, शनिवारी साडे अकराच्या सुमारास एका व्यक्तीला एका पिशवीमध्ये काहीतरी असल्याचे दिसले. त्याने पिशवी बघितली असता त्यात जिवंत काडतुसे आढळून आली. त्याने पोलिसांना माहिती दिली.

गिट्टीखदान ठाण्याचे निरीक्षक महेश सागडे यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. गोरेवाडा परिसरात बॉम्ब शोध व नाशक पथकाद्वारे परिसराची तपासणी सुरू करण्यात आली. सोबतच दहशतवादी विरोधी पथकाचे (एटीएस) अधिकारी, पोलीस उपायुक्त राहुल मदने, सहायक पोलिस आयुक्त अभिजित पाटील यांच्यासह ताफा घटनास्थळी दाखल झाला. (Latest Marathi News)

एवढ्या मोठ्या प्रमाणावर काडतुसे आढळून आल्याने यामागे घातपात घडवून आणण्याचा तर प्रयत्न होता की काय, याबाबत पोलीस यंत्रणेकडून तपास सुरू झाला आहे. इतर यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. बॉम्ब शोध व नाशक पथकाद्वारे परिसराची तपासणी सुरू करण्यात आली.

ही काडतुसे आली कुठून

■ शहरातील आजूबाजूच्या परिसरात डिफेन्स कारखाना असून कळमेश्वर मार्गावरही याच्याशी संबंधीत केंद्र आहे. ही काडतुसे नवीन काटोल नाका परिसरातील गोरेवाडा जंगल परिसरात सापडली. त्यामुळे ही काडतुसे या केंद्रातील तर नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान सायंकाळपर्यंत बॉम्बशोध व नाशक पथकाकडून या काडतूसांचा शोध सुरू होता. राज्याच्या गृहमंत्रालयाकडूनही याची दखल घेण्यात आली असून पोलीस यंत्रणेकडून याची माहिती घेण्यात आली आहे. (Latest Marathi News)

काडतुसे तीस वर्षे जुने असल्याचा दावा

■ गोरेवाडा जंगल परिसरात सापडलेले १५७ जिवंत काडतूस या तीस वर्ष जुने असल्याचा दावा पोलीस सूत्रांकडून करण्यात येत आहे. यापैकी बरेच काडतूस गंजलेल्या अवस्थेतील असल्याचेही सांगण्यात आले. मात्र, ही काडतुसं कुठून आली याबाबत पोलीस विभागाने मौन बाळळले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; कर्जबाजारी बापाचा निर्भिड पुत्र, मुंढेंची २४ वी बदली का झाली?

Mumbai-Pune Accident: मुंबई-पुणे प्रवास बनतोय जीवघेणा! बळींचा आकडा टेन्शन वाढवणारा; धक्कादायक आकडेवारी समोर

Latest Marathi News Updates Live : वनताराचे अधिकारी कोल्हापुरात दाखल

Pune News : वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणीने वसतिगृहातील एका खोलीत गळफास घेऊन संपविले जीवन

Gautam Adani Resign: गौतम अदानींचा राजीनामा! सर्वात मोठं पद सोडण्यामागचं कारण आलं समोर, कार्यकारी अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती?

SCROLL FOR NEXT