Maharashtra Budget 2023 esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Budget : अर्थसंकल्पात 'नागपूर'ला झुकतं माप; फडणवीसांनी कोणत्या केल्या मोठ्या घोषणा?

अर्थसंकल्पीय भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा हा पहिला अर्थसंकल्प आहे.

Maharashtra Budget 2023 : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून महाराष्ट्राचा 2023-24 या वर्षाकरता अर्थसंकल्प सभागृहात सादर करण्यात आला.

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. तर, या अर्थसंकल्पीय भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहे. यात नागपूरला (Nagpur) झुकतं माप दिलंय.

अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरसाठी भरघोस निधी दिला असून मोठ्या प्रमाणात विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. नागपुरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी 228 कोटींची तरतूद केली आहे. नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, कळमेश्वरसाठी 20 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

याशिवाय, नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी (43.80 कि. मी) 6708 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारासाठी निधी देण्यात आला आहे, तर नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटींची तरतूद केली आहे.

नागपुरात 1000 एकरावर लॉजिस्टिक हब करण्यात येणार आहे. याशिवाय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर आणि महाराष्ट्र राष्ट्रीयविधी विद्यापीठ, नागपूर इमारत बांधकामासाठी निधी दिला जाणार आहे. तसेच नागपूर विभागीय क्रीडा संकुलासाठी 100 कोटी तर, श्री संत जगनाडे महाराज आर्टगॅलरी, नागपूरसाठी 6 कोटींची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. या शिवाय, मराठवाड्याचा दुष्काळ मिटवण्यासाठी 20 हजार कोटींची तरतूद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT