Eknath Shinde, Devendra Fadanvis
Eknath Shinde, Devendra Fadanvis Sakal Digital
महाराष्ट्र

लोणार सरोवर संवर्धनासाठी ३६९ कोटी मंजूर; मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये जगप्रसिद्ध अशा लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी ३६९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. (Cabinet meeting news in marathi)

या व्यतिरिक्त मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामीण गृहनिर्माण योजनेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील भूमिहिन लोकांना घरासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे बेघर आणि भूमिहिन लोकांना हक्काचं घर मिळणार आहे.

लोणार सरोवर जागतीक पातळीवरील पर्यटन स्थळ असून मागील अनेक दिवसांपासून याच्या संवर्धनासाठी निधीची मागणी होत होती. आज ती मागणी मान्य झाली आहे.

या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना मध्यम व उच्चदाब वीजेच्या बिलात प्रतियुनिट एक रुपया सवलत देण्याचा निर्णय घेतला असून याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, असंही शिंदे यांनी म्हटलं. तसेच ग्रामीण भूमिहिन घरकूल योजनेत मुद्रांक शुल्क एक हजार रुपये निश्चित कऱण्यात आलं. तर मोजणी शुल्कात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय़ झाला आहे. तसेच स्मार्ट मीटरची घोषणाही त्यांनी केली.

दरम्यान पैठणमध्ये ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेला मान्यता देण्यात आली आहे. या योजनेत ६० गावं असून हजारो एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्याबरोबर मुंबरी धरणासाठी १५५० कोटी, जळगाव येथील वाघुर योजनेसाठी २२८८ कोटी रुपयांच्या योजनेसाठी मान्यता देण्यात आली आहे. तर मराठवाड्यातील हळद संशोधन केंद्रासाठी मान्यता देण्यात आली असून त्यासाठी १०० कोटींची तरतूद केल्याचं शिंदे यांनी नमूद केलं. तर लोणार सरोवराच्या विकास आराखड्यासाठी ३६९ कोटींच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याचं शिंदे यांनी नमूद केलं.

दरम्यान गणेशोत्सव, दहिहंडीसह कोरोनाकाळात तरुणांवर झालेल्या छोट्या केसेस मागे घेण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतल्याचं शिंदे यांनी नमूद केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT