NCP Leader Jayant Patil File Photo
महाराष्ट्र बातम्या

माझी प्रकृती उत्तम! जयंत पाटील यांनी सांगितलं रुग्णालयात दाखल होण्यामागचं कारण

विनायक होगाडे

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती मिळाली होती. त्यांना उपचारांसाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना अचानकच त्रास सुरू झाला. त्यामुळे मंत्रिमंडळाची ही बैठक अर्धवटरित्या सोडून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबत आता जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटरवरुन स्वत:च माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सुचना केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल. धन्यवाद!

जयंत पाटील यांनी नुकताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केलेला आहे. कोल्हापूरमधील पूर परिस्थितीची त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पाहणी केलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT