Cold
Cold Sakal
महाराष्ट्र

Maharashtra Cold : निम्मा महाराष्ट्र गारठला! निफाड येथे नीचांकी ७.४ अंश सेल्सिअसची नोंद

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या उत्तरेकडील भाग, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हे थंडीने गारठले आहेत. किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा तीन अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाला असून, पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे मंगळवारी वर्तविण्यात आला.

निफाड येथे नीचांकी ७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सर्वाधिक कमाल तापमान सोलापूर येथे ३४ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

मध्य महाराष्ट्रातील प्रमुख दहा पैकी पाच शहरांमध्ये किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमी झाला होता. पुणे, नगर, जळगाव, सातारा, सोलापूर या शहरांचा त्यात समावेश होतो. संध्याकाळनंतर हुडहुडी भरविणारी थंडी पडत आहे. कोकण किनारपट्टीवरील सर्वच जिल्ह्यांमध्ये थंडी वाजत आहे. तसेच, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश भागात थंडीचा कडाका वाढल्याने शेकोट्या पेटल्या आहेत.

उत्तरेत थंडीची लाट

उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असून, मंगळवारी (ता. १६) हरियानाच्या हिस्सार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारसह उत्तर भारतात धुक्याचे साम्राज्य कायम आहे. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्लीसह उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

का वाढला गारठा?

  • पंजाब ते अरुणाचल प्रदेशपर्यंत दाट धुके पसरले आहे.

  • उत्तरेतून महाराष्ट्राच्या दिशेने थंड वारे वहात आहेत.

  • आकाश निरभ्र असल्याने गारठा वाढला.

हवामान अंदाज

  • राज्यात किमान तापमानातील घट कायम राहून गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

  • हवामान कोरडे राहण्याची शक्यता

राज्यातील प्रमुख शहरांमधील किमान तापमान (आकडे अंश सेल्सिअसमध्ये)

निफाड ७.४, धुळे ८, छत्रपती संभाजीनगर ९.२, जळगाव ९.४, नगर ९.६, नाशिक ९.८, पुणे १०.८, यवतमाळ ११.५, अकोला १२.३, सातारा १२.४, गोंदिया १२.४, बुलडाणा १२.६, परभणी १३.५, अमरावती १३.५, वर्धा १४, नांदेड १४, वाशीम १४, गडचिरोली १४.२, नागपूर १४.२, चंद्रपूर १४.४, सोलापूर १४.५, महाबळेश्वर १४.७, डहाणू १५.५, सांगली १५.८, ब्रह्मपुरी १५.८, सांताक्रूझ १६.२, रत्नागिरी १६.३, कोल्हापूर १६.९.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT