Corona
Corona  esakal
महाराष्ट्र

Corona Update: राज्याला दिलासा; दिवसभरात 26 हजार 616 नवे रुग्ण

कार्तिक पुजारी

मुंबई- महाराष्ट्रातील कोरोना आकडेवारीचा आलेख काही दिवसांपासून घसरता आहे. गेल्या २४ तासांत राज्यात 26 हजार 616 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर 48,211 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या २४ तासांत 516 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 54,05,068 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 48,74,582 रुग्णांनी विषाणूला हरवलं आहे. 82,486 रुग्णांना कोरोना विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 4,45,495 रुग्ण सक्रिय आहेत. (Maharashtra corona update health ministry)

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  90.19% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण 4,45,495 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज 516 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण 516 मृत्यूंपैकी 289 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 227 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 484 ने वाढली आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर 1.53% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,13 38 407 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54,05,068  (17.25 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात 33,74,258व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 28,102 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT