

Maharashtra Weather Update monsoon low pressure area bay of bengal
esakal
Maharashtra Rain Forecast : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून, त्याच्या प्रभावामुळे राज्यातील काही भागांत पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात जोरदार सरींची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे.