Corona
Corona  esakal
महाराष्ट्र

Corona Update: राज्यात दिवसभरात 42 हजार 582 रुग्ण; 850 मृत्यूमुखी

कार्तिक पुजारी

मुंबई- महाराष्ट्रातील कोरोना आकडेवारी (maharashtra Corona Update ) स्थिरतेकडे जाताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 42 हजार 582 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 54 हजार 535 रुग्णांनी विषाणूवर मात केली आहे. राज्यात 24 तासांत 850 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 52 लाख 69 हजार 292 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर 46 लाख 54 हजार 731 रुग्णांनी कोरोनाला हरवलं आहे. राज्यात आतापर्यंत 78 लाख 857 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या 50 हजारांपेक्षा कमी सापडत आहेत. राज्यात सध्या कोरोनाचे 5 लाख 33 हजार 294 सक्रिय रुग्ण आहेत. (maharashtra Corona Update patients health ministry rajesh tope)

आज दिवसभरात 54,535 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या  46,54,731 इतकी आहे.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून ते 88.34 % एवढे झाले आहे.राज्यात मृतांचा आकडा पुन्हा एकदा वाढला असून आज 850 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबई मध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून येथे 68 मृत्यू नोंदवण्यात आले. तर कल्याण डोंबिवली मनपा 52,बीड 62,नागपूर मनपा46 मृत्यू झाले.  मृत्यूचा दर 1.5 % इतका आहे.आज नोंद झालेल्या 850 मृत्यूंपैकी 409 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 160 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.तर 281 मृत्यू हे आठवड्यापेक्षा अधिक कालावधी पूर्वीचे आहेत. राज्यात आज रोजी एकूण 5,33,294 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,03,51,356 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 52,69,292 (17.36 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 35,02,630 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 28,847 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT