Maharashtra Din sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Din : महाराष्ट्र दिनाच्या अशा द्या हटके शुभेच्छा, पहा एकापेक्षा एक भारी मेसेज

मुंबई या द्विभाषिक राज्यातून स्वतंत्र भाषा बोलणारं स्वतंत्र राज्य निर्माण करण्यात आलं.

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Din : आज एक मे महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिन हा मराठी अस्मितेचा दिवस. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची विभागणी करण्यात आली आणि स्वतंत्र महाराष्ट्र उदयास आले. मुंबई या द्विभाषिक राज्यातून स्वतंत्र भाषा बोलणारं स्वतंत्र राज्य निर्माण करण्यात आलं.

मराठी माणसांसाठी हा महाराष्ट्र दिन गौरवाचा दिवस असतो. या दिवशी मराठी लोक एकमेकांना महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा देतात. आज आपण अशाच शुभेच्छांची लिस्ट बघणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (Maharashtra Din wishes quotes status messages )

1. माझा माझा महाराष्ट्र माझा
मनोमनी वसला शिवाजी राजा
वंदितो या भगव्या ध्वजा
गर्जता गर्जतो.. महाराष्ट्र माझा..
१ मे महाराष्ट्र दिनाच्या
आपणांस हार्दिक शुभेच्छा..!

2. जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्रदिन
निमित्त आपणास
हार्दिक शुभेच्छा..!

3. दरी दरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा,
जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्रदिन निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

4. तू माझी नसली तरी,
मी तुझाच आहे..
कारण तू
महाराष्ट्राची आहे,
आणि महाराष्ट्र माझा आहे…
जय महाराष्ट्र!

5. माझा माझा महाराष्ट्र माझा,
मनोमनी वसला शिवाजी राजा,
वंदितो या भगव्या ध्वजा,
गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा…
गर्जा महाराष्ट्र माझा…!

6. भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा,
आस्मानाच्या सुलतानीला,
जवाब देती जीभा..
सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा..
जय जय महाराष्ट्र माझा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

7. “जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी…

गुणगुणलो जे गीत गीत मराठी….

मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

8. “लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी…

मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा”

9. “राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा

नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा,  

प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा.”

मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

10. “आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा,

आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा

आम्ही जपतो आमची संस्कृती

आमची निष्ठा आहे मातीशी.”

मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

 11. “अखंड राहो सदा हे शिवराष्ट्र

जयघोष करूया जय जय जय जय महाराष्ट्र.”

“अभिमान आहे मराठी असल्याचा,

गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा….

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

12. “दगड झालो ना तर सह्याद्रीचा होईल,

माती झालो तर महाराष्ट्राची होईल,

तलावर झालो ना तर भवानी मातेची होईल,

आणि मानव जन्म मिळाला तर महाराष्ट्रातच होईल.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

SCROLL FOR NEXT