Union Home Minister award sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra News : महाराष्ट्राला तपासात एकही केंद्रीय गृहमंत्रिपदक नाही

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून २०२३ या वर्षासाठी ‘उत्कृष्ट तपासासाठी केंद्रीय गृहमंत्रिपदकां’ची यादी जाहीर झाली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - केंद्रीय गृह मंत्रालयाकडून २०२३ या वर्षासाठी ‘उत्कृष्ट तपासासाठी केंद्रीय गृहमंत्रिपदकां’ची यादी जाहीर झाली; परंतु यादीत महाराष्ट्राला एकही पदक प्राप्त झाले नसल्याची बाब समोर आली आहे.

केंद्रीय तपास यंत्रणा, विविध राज्यांतील पोलिसांना तपासात उत्कृष्टतेसाठी केंद्रीय गृहमंत्रिपदक दिले जाते. तपास अधिकाऱ्यांच्या गुणवत्तेस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पुरस्काराची सुरुवात केली होती.

यंदा २०२३ वर्षासाठी देशातील १४० पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘उत्कृष्ट तपासासाठी केंद्रीय गृहमंत्रिपदक’ प्रदान करण्यात आले. पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांमध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) १५, राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) १२, उत्तर प्रदेशातील दहा, केरळ आणि राजस्थान राज्यातील प्रत्येकी नऊ, तमिळनाडूचे आठ, मध्य प्रदेशचे सात आणि गुजरात राज्यातील सहा जणांचा समावेश आहे.

याशिवाय इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील अधिकारी आहेत. यादीत महाराष्ट्र पोलिस दलातील एकाही अधिकारी-कर्मचाऱ्यांना स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार तांत्रिक दोषामुळे घडला की इतर काही कारण असावे, याबाबत पोलिस दलात तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

Mumbai Local: माकडाच्या हट्टापुढे रेल्वेही थांबली! बोरिवलीत रेल्वे वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT