पूरग्रस्त  sakal
महाराष्ट्र बातम्या

पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटी; राज्य सरकारचा निर्णय

नुकसानीची भरपाई म्हणून १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली.

‘सह्याद्री’ येथे झालेल्या या बैठकीमध्ये पूरग्रस्तांना भरपाई देण्याचा विषय ऐनवेळी चर्चेला आला. राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे जून ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ‘एनडीआरएफ’च्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाने तो एकमुखाने मंजूर केला. ही मदत कशापद्धतीने दिली जावी, याबाबत मदत व पुनर्वसन विभाग लवकरच शासन निर्णय काढणार आहे.

राज्यात जून महिन्यांपासून अवकाळी पावसाने लाखो शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. अजूनही राज्यात पाऊस पडत आहे. आणखी पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

ऐनवेळचा निर्णय

राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांची अवस्था सध्या दयनीय आहे. त्यांच्या भावनेचा उद्रेक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होऊ नये, याची दखल घेताना आज मंत्रिमंडळ बैठकीत मदत देण्याचा विषय अचानक आल्याचे सांगण्यात आले. मदत व पुनर्वसन खात्याला अंधारात ठेवून अचानकपणे हा निर्णय घेतल्याचे या विभागाचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर बावनकुळेंच्या खात्याला जाग; फक्त ५०० रुपये स्टॅम्प ड्युटी भरणाऱ्या पार्थ पवारांच्या कंपनीला ४२ कोटींची नोटीस

Ind vs Aus 5th T20 : आज अखेरचा टी-२० सामना, भारताला परदेशात आणखी एका मालिका विजयाची संधी, किती वाजता सुरु होईल सामना?

Indian Air Force Recruitment: भारतीय वायुदलात अधिकारी होण्याची संधी; AFCAT 1 2026 भरतीची अधिसूचना जाहीर

Zilla Parishad Election : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू; पुढील १०-१२ दिवसांत घोषणेची शक्यता

Agriculture News : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ३० जूनपर्यंत कर्जमाफी, ऊस ठिबक सिंचनाला प्रतिटन शंभर रुपये अनुदान : कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे

SCROLL FOR NEXT