National Tourism Award 
महाराष्ट्र बातम्या

National Tourism Award : महाराष्ट्राची पर्यटन पुरस्कारांत बाजी

नऊ राष्ट्रीय पुरस्कारांसह दुसरा क्रमांक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र राज्याने पर्यटनात बाजी मारली असून तब्बल नऊ राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार पटकावले आहेत. पर्यटनात सर्वोत्कृष्ट राज्याच्या पुरस्कारामध्येही महाराष्ट्राने दुसरा क्रमांक मिळवला असल्याची माहिती पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली.

भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे जागतिक पर्यटन दिनी राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार प्रदान केले जातात. कोरोना काळात दोन वर्षे हे पुरस्कार दिले नव्हते. त्यामुळे सन २०१८-१९ या वर्षाकरिताचे पुरस्कार उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी उपस्थित होते.

महाराष्ट्राला प्रथमच सर्वोकृष्ट राज्यासाठीचा सर्वंकष पर्यटन विकासाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असून पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने तो स्वीकारला. हे राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार हे हॉटेल, वाहतूक, गाईड, वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन, नागरी सुविधा अशा विविध श्रेणींत काम करणाऱ्या खासगी व सार्वजनिक संस्थांना दिले जातात.

पुरस्कार मिळवणाऱ्या संस्था

१. पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन सर्वोत्कृष्ट राज्यात दुसरा क्रमांक

२. नागरी सुविधा - पाचगणी नगर परिषद (सातारा)

३. ताजमहाल पॅलेस पाच तारांकित डिलक्स, मुंबई

४. वेलनेस पर्यटन आत्मंतन वेलनेस रिसॉर्ट, मुळशी (पुणे)

५. ग्रामीण पर्यटन, सगुणाबाग (नेरळ), चंदन भडसावळे

६. जबाबदार पर्यटन वेस्टर्न रुट्स, पुणे

७. गीते ट्रॅव्हल्स मनमोहन गोयल

८. वाहतूक ओरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस लि.

९. होमस्टे दाला रुस्तर (पाचगणी) कॅप्टन विकास गोखले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT