महाराष्ट्र बातम्या

Cabinet Meeting: देशी गायी 'राज्यमाता-गोमाता' म्हणून घोषित; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Gomata: देशी गायींच्या बाबतीत सरकारने निर्णय जाहीर केला असून त्यामाध्यमातून गायींचं संवर्धन होणं ही अपेक्षा ठेवण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे देशी गायींच्या संबंधाने कोणते नियम असतील, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे.

संतोष कानडे

Maharashtra Government: राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. देशी गायींना राज्यमाता म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. सोमवारी कॅबिनेट बैठक बोलावण्यात आलेली असून या बैठकीमध्ये विधानसभेच्या तोंडावर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहेत.

राज्यातील देशी गायींना राज्यमाता-गोमाता म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायीच्या दुधाची मानवी उपयुक्तता,आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती, पंचगव्य उपचार, शेण गोमूत्र यांच्या सेंद्रिय शेतीतील महत्त्वाचे स्थान यामुळे देशी गायीबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे.

देशी गायींच्या बाबतीत सरकारने निर्णय जाहीर केला असून त्यामाध्यमातून गायींचं संवर्धन होणं ही अपेक्षा ठेवण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे देशी गायींच्या संबंधाने कोणते नियम असतील, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय

कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला अथवा कर्मचारी निवृत्त झाले तर त्यांच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. सेवानिवृत्ती उपदान १४ लाखांवरुन २० लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे तीन वर्षांमध्ये सरकारी तिजोरीवर १०० कोटी रुपयांचा भार पडणार आहे. ऐन विधानसभेच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 40 Questions List : जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमाती अन् विशिष्ट जातींची होणार नोंद; पाहा 40 प्रश्नांत काय?

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Sangli Milk Collection Drop : FDA च्या धाडींमुळे सांगलीतील दुधाचा 'बनावट खेळ' बंद? तब्बल 78 हजार लिटरने दुधाची आवक घटली; पाहा आकडेवारी

Marathi News Live Updates : बीडच्या इमामपूरचंही नाव बदलणार? मंत्री भरत गोगावलेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Shivsena Express: कोकण प्रवास मोफत करता येणार, गणेशोत्सवासाठी मुंबईतून विशेष ट्रेन सुटणार; कुठून आणि कधी?

SCROLL FOR NEXT