rajesh tope Sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्यात चिकनगुनिया वाढतोय; पाच वर्षातील सर्वाधिक रुग्णांची नोंद

भाग्यश्री भुवड

मुंबई : राज्यात वाढत्या पावसाळी साथ रोगाने (monsoon decease) डोके वर काढलं असून काही ठिकाणी कोविडपेक्षाही (corona) भयंकर स्थिती झालेली निदर्शनात येत आहे. सध्या राज्यात इतर पावसाळी आजारांच्या तुलनेत चिकनगुनियाचे रुग्ण (chikungunya patients) सर्वाधिक वाढत आहेत. गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक रुग्णांची राज्यात नोंद झाली आहे. ही चिंतेची बाब असून यावर सार्वजनिक आरोग्य विभाग आता कारवाई करू लागली आहे. दरम्यान, राज्याला त्रासदायक ठरत असलेल्या पावसाळी आजारांचा पिच्छा पुरवा, असे आदेश सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh tope) यांनी जिल्हा निहाय आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.

महाराष्ट्रात या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत चिकुनगुनिया तापाचे 2,006  रुग्ण आढळले, जे 2017 नंतरचे सर्वाधिक रुग्ण नोंदले गेले आहेत, 2017 साली 1,438 प्रकरणे नोंदवली गेली. 2018 आणि 2019 मध्ये राज्यात अनुक्रमे 1,009 आणि 1,646 प्रकरणे आढळून आली. 2020 च्या साथीच्या वर्षात, चिकनगुनियाची संख्या 782 पर्यंत घसरली. अनुकूल हवामान आणि सुधारित अहवाल यासह अधूनमधून पडणारा पाऊस यामुळे चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे राज्याच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

हा संसर्ग एडिस इजिप्ती डासाद्वारे पसरतो जो डेंग्यूच्या प्रसारासाठी देखील जबाबदार असतो. दुसरीकडे यंदा डेंग्यूच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. आतापर्यंत जवळपास 10,000 रुग्ण आणि 22 डेंग्यूमुळे मृत्यूची नोंद झाली आहे, गेल्या वर्षी 3,356 रुग्ण आणि दहा मृत्यू नोंदवण्यात आले होते. डेंग्यूची सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात (354) आहे. तर, महामंडळाने 215 रुग्ण नोंदले आहेत. नाशिक ग्रामीण आणि महानगरपालिका मिळून 905 रुग्णांची नोंद झाली आहे. इतर जिल्ह्यांपैकी साताऱ्यात 73, कोल्हापूर 148, बीड 38 आणि अमरावतीत 29 रुग्ण नोंदले आहेत.

राज्य साथरोग सर्वेक्षण अधिकारी, डॉ प्रदिप आवटे यांनी सांगितले की, दरवर्षी मान्सूनची तयारी सुरू केली जाते आणि दोन सर्वेक्षणे केली जातात. ज्यात कीटकशास्त्र आणि ताप निरीक्षणाचा समावेश असतो. आमचे अधिकारी त्यांच्या संबंधित क्षेत्रात फिरुन घरोघरी भेट देतात. तापाचे निरीक्षण करतात आणि डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे तपासतात.

चिकनगुनियाची 5 वर्षांची आकडेवारी

वर्ष संशयित रुग्ण

2017 8,110 1,438

2018 9,884 1,009

2019 5,158 1,646

2020 4,258 782

2021 3,365 2,006

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : मराठा आंदोलक जरांगे पाटील बैठकीसाठी बीडला रवाना

SCROLL FOR NEXT