Rain Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Rain Update : मुसळधार पावसाने राज्याला झोडपले; मुंबईत रेड अलर्ट

राज्याच्या आजूबाजूला सध्या कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्यामुळे सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्याच्या आजूबाजूला सध्या कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्यामुळे सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोकण, गोवा आणि मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत असून, उर्वरीत राज्यातही पावसाची संततधार कायम आहे.

मॉन्सून वाऱ्यांचा आस सध्या भारताच्या दक्षिणेत आहे. तसेच, छत्तीसगडच्या दक्षिण भागासह गुजरातमध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्यामुळे राज्यात मॉन्सूनचा जोर चांगलाच वाढला आहे. पुढील दोन दिवसांत बंगालच्या उपसागरात कमी दबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे येत्या काळात कोकण-घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर मुंबईमध्ये अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. याच काळात उर्वरीत राज्यात पावसाचा जोर कायम राहील, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल अशा अंदाजही वर्तविण्यात आली आहे.

गुरुवारसाठीचा अंदाज...

१) कोकण -गोवा - किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा, रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबईत रेड अलर्ट

२) मध्य महाराष्ट्र - बहुतांश ठिकाणी पाऊस, काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा

३) मराठवाडा - बहुतांश ठिकाणी पाऊस, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता

४) विदर्भ - सर्वत्र पाऊस, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस

महत्त्वाची पू्र्वसूचना -

- पुढील आठवडाभर पावसाळी पर्यटन आणि घाटमाथ्यावर ट्रेकींग टाळावे

- मोठ्या पावसामुळे वाहुतक कोंडी शक्य

- सखल भागात पाणी साचण्याची शक्यता

- घाट क्षेत्रात माती आणि दरड घसरण्याची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT