महाराष्ट्र

मोठी बातमी: MIDCचा सर्व्हर हॅक, हॅकर्सकडून 500 कोटींची मागणी

सुरज सावंत

मुंबई: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा सर्व्हर हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकारामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तसंच हॅकर्सकडून पाचशे कोटींची मागणी केल्याचंही समजतंय. Midc च्या अधिकृत मेल आयडीवर 500 कोटींच्या मागणीचा मेल आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.  

हॅकर्सनी यासंदर्भात पाचशे कोटी रूपयांची मागणी केल्याची माहिती मिळत आहे. मागणी पूर्ण केली नाही तर डेटा हॅक करण्यात आलेल्या सर्व्हरवरील सर्व महत्वाचा डेटा नष्ट करण्याची धमकीही हॅकर्सची दिल्याचं प्रशासनातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान डेटा रिस्टोर करून यासंदर्भात सायबर सेलकडे तक्रार करावी असं मत सायबर तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

हॅकर्स देशातील आहेत की परदेशातील आहेत या संदर्भात अजूनही माहिती उपलब्ध झाली नसली तरी त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे.  मात्र एमआयडीसीच्या डेटा हॅक झाल्याचे  समोर येताच एमआयडीसी प्रादेशिक कार्यालयात  चौकशी सुरू करण्यात आली असून सर्व्हरची सिस्टिम व्यवस्थित होईपर्यंत कामकाजाची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी उद्योजकांसह औद्योगिक संघटनांकडून होत आहे.

दरम्यान याआधीही  गेल्यावर्षी मुंबई आणि परिसरातील वीज गायब होण्यामागे चिनी सायबर हल्ल्याचा संशय गृहमंत्री आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केला होता मात्र MIDC चा डेटा हॅक झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

गेल्या सोमवारपासून एमआयडीसीचा सर्व्हर हॅक झाल्याने राज्यातील मुंबईतील मुख्य कार्यालयासह 16 प्रादेशिक कार्यालयातील संपूर्ण कामकाज बंद पडले आहे. एमआयडीसीशी संबंधीत सर्व औद्योगिक वसाहती, उद्योजक, शासकीय घटक आणि विविध योजनांची संपूर्ण माहिती ही एका ऑनलाईन सिस्टिमवर आहे. या सिस्टिम सर्व्हरचा डेटा हॅक झाला आहे. त्यामुळे गेल्या सोमवारपासून संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे. एमआयडीसीतील कॉम्प्युटर सुरु केल्यानंतर त्यात व्हायरस दिसत आहे. त्यामुळे जर या सिस्टिममध्ये प्रवेश केला, तर डाटा नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळे एमआयडीसीने सर्व कार्यालयांना कॉम्प्युटर सुरु करु नका, अशी सूचना केली असल्याचंही समजतंय.

------------------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Maharashtra Industrial Development Corporation server hack 500 cr demand by hackers

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : भुजबळ यांच्या नाराजीवर तटकरेंचे ‘ऑल इज वेल’; प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी घेतली भुजबळांची भेट

Nupur Shikhare- Ira Khan : नुपूर शिखरेच्या आईचा बॉसी अंदाज; नवऱ्याची अवस्था पाहून आमिरची लेक म्हणाली...

SRH vs GT: सामना रद्द झाल्यानंतर काव्या मारन अन् विलियम्सनचं रियुनियन, सनरायझर्स हैदराबादन शेअर केला खास Video

VIDEO: पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत भर कार्यक्रमात गैरवर्तन; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "दहा हजारपेक्षा जास्त लोकांचा जमाव..."

Latest Marathi News Live Update : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे

SCROLL FOR NEXT