corona vaccination sakal
महाराष्ट्र बातम्या

Covid 19 : लसीकरणात महाराष्ट्र देशात अव्वल

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून महाराष्ट्रासह देशभरात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. ही मोहीम सुरू झाल्यापासून तीन कोटी कोविड -19 लस देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, 25: कोविड लसींचे देशात 3 कोटी डोस देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. शुक्रवारी दुपारी 2 वाजता महाराष्ट्राने हा टप्पा पार केला. राज्यात आतापर्यंत 3,00,27,217 लस डोस देण्यात आले असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी साांगितले. (Maharashtra leads Indias Vaccination Program with More Than 3 crore doses of Covid 19 vaccines)

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून महाराष्ट्रासह देशभरात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. ही मोहीम सुरू झाल्यापासून तीन कोटी कोविड -19 लस देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली.

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे मुंबईसह राज्यात रुग्ण आढळत आहे.

हा प्रकार तिसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी टास्क फोर्सने लसीकरणावर भर देण्याची सूचना केली आहे. या सूचनेमुळे राज्यात लसीकरणाची गती वाढलेली दिसते. 

राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) डॉ. प्रदीप व्यास म्हणाले की, गुरुवारपर्यंत महाराष्ट्रात लसींचे 2,97,23,951 डोस देण्यात आले, तर शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास तीन कोटींचा आकडा पार केला. ते म्हणाले की, दुपारी 2 वाजेपर्यंत एकूण डोसची संख्या 3,00,27,217 वर पोहोचली. तर मुंबईत 49 लाख कोरोना डोस देण्यात आले आहेत.  महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश

लसीकरणात दुसर्‍या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशात  2,89,22, 605 लोकांना लसीचे डोस देण्यात आले असून गुजरातमध्ये 2,39,18,802 एवढ्या नागरिकांना डोस दिला गेला आहे ज्यामुळे गुजरात तिसर्‍या क्रमांकावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: नागपुरात विजांचा कडकडाटसह पावसाला सुरूवात...

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT