मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम काते तसेच मुंबईतील ठाकरे व कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक व नगरसेविका यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. काँग्रेसचे माजी नगरसेवक पुष्पा कोळी, वाजीद कुरेशी, बब्बू खान, गंगा माने, भास्कर शेट्टी, कुणाल माने, ज्योसना परमार, यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सिद्धीविनायक मंदिराचे ट्रस्टी भास्कर शेट्टी यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला.
शेवटच्या घटकाला विचारात घेऊन काम करण्याची माझा पद्धत आहे. त्यामुळे जोपर्यंत मंत्रिमंडळात आहे तोपर्यंत सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका मी घेणार आहे, असं अजित पवार बोलताना म्हणाले.
बारामतीमध्ये अजित पवारांचा नागरी सत्कार होत आहे. यावेळी समर्थकांनी भावी मुख्यमंत्री असे फलक झळकावले.
बारामतीमध्ये अजित पवारांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या सभेला आता सुरुवात झालेली असून काही वेळात अजित पवार मनोगत व्यक्त करतील.
अजित पवार यांचं सभास्थळी आगमन झालेल आहे असून त्यांचा नागरी सन्मान सोहळा सुरु झाला आहे.
अजित पवार हे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीमध्ये गेले आहेत. बारामतीमध्ये रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करत नागरिकांनी त्यांचं स्वागत केलं. अजित पवारांवर उपस्थितांनी पुष्पवृष्टी केली.
चांद्रयानच्या लँडर मधून प्रज्ञान रोव्हर बाहेर पडले असून रोव्हर आता चंद्रावर फिरत आहे. लँडरमधील कॅमेऱ्यात रोव्हरचा प्रवास कैद झाला आहे. इस्रोने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर शेअर करत माहिती दिली आहे.
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांचं बारामती शहरामध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. थोड्या वेळात त्यांची सभा होत आहे.
आनंद दिघे ह्यांना स्मृतीदिन असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिंदे गटातील आमदारांसह ठाण्यातील आनंद मठ येथे पोहचले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघेंच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केले. आनंद दिघेंच्या पुण्यतिथीनिमीत्त ठाण्यात विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपानहून परतले आहेत. मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर आशिष शेलार यांनी फडणवीसांचे स्वागत केले.
येत्या ३ सप्टेंबर महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात जनसंवाद यात्रा सुरू करत आहोत, पश्चिम महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण, उत्तर महाराष्ट्र बाळासाहेब थोरात मराठवाडा अशोक चव्हाण, पश्चिम विदर्भ विजय वडट्टेवार आणि पूर्व विदर्भ मी तर कोकणात आम्ही सगळे जाणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.
रश्मी शुक्ला केस वर बोलताना पटोले म्हणाले की, सत्तेच्या भरवश्यावर काही करू शकतात्या. वेळी रश्मी शुक्ला चौकशी सुरू झाली तेव्हा फोन टॅपिंग केली होती. गुन्हे दखल झाले होते
जसे फडणवीस गृहमंत्री झाले त्यावेळी रश्मी शुक्ला क्लिनचीट दिली. मग हे प्रकरण सीबीआय दिले. त्यांच्या वॉशिंग मशीन मध्ये धुतले, माझे नाही खडसे फोन टॅपिंग झाले हे सिद्ध झाले आहे. कधी तरी फाईल उघडेल. आज क्लिनचीट दिली तरी भविष्यात आम्ही फाईल उघडू असेही नाना पटोले म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती येथील सुपे पोलिस ठाण्याच्या इमारतीचे उद्घटन करण्यात आले. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार आज पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर आले आहेत.
सत्तेत सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आज पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर आले आहेत. यावेळी बारामती येथील सुपे चौकात अजित पवारांचं कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं. बारामती येथे अजित पवार जाहीर सभा देखील घेणार
ठाण्यात पालघर मध्ये जो विजय मिळतो तो फक्त आनंद दिघे यांच्या मुळेच मिळतोय.. आता त्याच पद्धतीने आता इतर जिल्ह्यांमध्ये देखील कार्यपद्धती राबवली जाणार.
शरद पवार अजित पवार एकत्र भेटतात काय.. सध्या सत्तेत जे आले आहेत त्यांच्या वक्तव्यावरून लक्षात येत की हा सामंजस्य करार झालं असल्याचं समजत - गजानन कीर्तिकर
दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसच्या ४ दिवसांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीला परतले आहेत. त्यांनी आज सकाळी बंगळुरूमध्ये इस्रोच्या शास्त्रज्ञांचीही भेट घेतली
धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिदिन आहे. या निमित्ताने आज ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमात आणि दिघे यांच्या शक्तीस्थळावर ठाणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली . यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिघे यांना अभिवादन करण्यासाठी येणार आहेत.. यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते 25 रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले जाणार आहे..
कोरोना काळातील बॉडीबॅग घोटाळा प्रकरणात बीएमसीचे तात्कालीन उपआयुक्तांचा आज चौकशी केली जाणार आहे. या घोटाळ्यात पालिका अधिकारी रमाकांत बिरादार आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर झाले आहेत. या प्रकरणात शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप आहेत.
जम्मू काश्मीर - सीज अँड सर्च ऑपरेशन (CASO) टीमचा एक भाग असलेल्या SOG जवानांना पुंछमधील सुरनकोट गंगना टॉप येथे संशयास्पद हालचाल दिसून आली. यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून चार ते पाच दहशतवादी असल्याची माहिती समोर आली आहे.
तामिळनाडू येथे ट्रेनला आग लागून झालेल्या दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढून 10 वर पोहचला आहे
तमिळनाडू येथे ट्रेनला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत 8 जण ठार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दुर्घटनेत 20 जण जखमी झाले आहेत.
तामिळनाडू येथे पुनालूर-मदुराई एक्स्प्रेसमध्ये आज पहाटे ५:१५ वाजता मदुराई यार्ड येथे खाजगी/वैयक्तिक डब्यात आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाने आग विझवली असून अन्य डब्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. प्रवाशांना गॅस सिलिंडरची तस्करी केल्याचा आरोप असून यामुळेच आग लागल्याची माहिती दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
भारताची चंद्रावरील मोहिम चांद्रयान तीन ज्या दिवशी चंद्रावर उतरले तो २३ ऑगस्ट हा दिवस आता 'राष्ट्रीय अवकाश दिवस' म्हणून साजरा केला जाणार आहे. PM मोदीनी इस्त्रोच्या मुख्यलयात शास्त्रज्ञांना संबोधित करताना याबद्दलची घोषणा केली आहे.
चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान उतरले त्या जागेला 'शिवशक्ती' पाँइट असे नाव देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी चांद्रयान-३ चे मून लँडर उतरले, ते ठिकाण ‘शिवशक्ती’ म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तसेच 2019 मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर ज्या ठिकाणी चांद्रयान-2 ने आपल्या पावलांचे ठसे सोडले ते ठिकाण 'तिरंगा पॉइंट' म्हणून ओळखले जाईल.
तुमच्या सगळ्यांना भेटून एक वेगळाच आनंद होतोय, असा अनंद खूप कमी वेळा होतो. शरीर आणि मन आनंदाने भरून गेलं आहे. दरम्यान शास्त्रज्ञांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांना अश्रू अनावर झाले.
आज, मला एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती येत आहे...असे प्रसंग फार दुर्मिळ आहेत...यावेळी मी खूप अस्वस्थ होतो...मी दक्षिण आफ्रिकेत होतो पण माझे मन तुमच्यासोबत होते, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
चांद्रयान 3 च्या यशानंतर आफ्रीका आणि ग्रीसच्या दौऱ्याहून परतलेल्या पंतप्रधान मोदींनी आज बेंगळुरूमध्ये इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली. मोदी यांनी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांची भेट घेत चंद्रावर चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रोच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत. यावेळी बेंगळुरूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून रोड शो चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हजारो सामान्य नागरिक त्यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या बाजूला जमा झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी बेंगळुरू येथील इस्रो टेलीमेट्री ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये जाताना लोकांना शुभेच्छा देत आहेत. येथे ते चंद्रयान3 मिशनमध्ये सहभागी असलेल्या इस्रो टीमच्या शास्त्रज्ञांना भेटतील .
बेंगळुरू येथील एचएएल विमानतळावरून पंतप्रधान मोदी इस्रोसाठी रवाना झाले. चांद्रयान-३ मोहिमेत सहभागी असलेल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांना ते थोड्याच वेळात भेटणार आहेत.
बेंगळुरू विमानतळाबाहेर लोकांना संबोधित करताना त्यांनी एक नवीन घोषणा दिली. जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंध असे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.