sakal breaking notifiction esakal
महाराष्ट्र बातम्या

Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

अंकिता खाणे (Ankita Khane)

नाशिकमध्ये रंग तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग

नाशिकमध्ये शिंदे पळसे भागात रंग तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. सध्या आजूबाजूच्या कंपनीला यामुळे आगीचा धोका निर्माण झाला आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शिंदे पळसे एमआयडीसीमधील कंपनीला भीषण आग लागली. त्यानंतर लगतच्या एका कंपनीला आग लागली. दोन्ही कंपन्यांमध्ये आगीचे लोळ निर्माण झालेत. दोन्ही कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल साठा असल्याची माहिती मिळत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत आहेत.

दिल्लीमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम!

दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता अतिशय वाईट पातळीला गेली आहे. या पार्श्वभूमीवर पाच दिवसांसाठी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच कंपन्यांना ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दिल्ली आणि एनसीआर परिसरातील सर्व बांधकामे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मस्जिद बंदर परिसरातून अडीच कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त

मुंबईमध्ये अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. मस्जिद बंदर परिसरातून अडीच कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे.

भारताची मदत भूकंपग्रस्त नेपाळला पोहोचली

भारताने भूकंपग्रस्त नेपाळला मदत पाठवली आहे. भारताने नेपाळला वैद्यकीय आणि रिलीफ सामग्री पाठवली आहे. एस जयशंकर यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

कर्नाटकात महिला अधिकाऱ्याची हत्या

कर्नाटकातील बंगळुरुमध्ये एका महिला सरकारी अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळून आला. यावेळी महिलेचे पती आणि मुलगा बाहेरगावी गेले होते. पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.

कोहलीचा विक्रम; सचिन तेंडुलकरला टाकले मागे

विराट कोहलीने आपल्या कारकीर्दीतील ४९ वे शतक पूर्ण केले आहे. त्यांच्या या शतकामुळे त्याने सचिन तेंडुलकर याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

बिहारच्या जातगणनेची माहिती खोटी; अमित शाहांचा आरोप

बिहारच्या जातगणनेची माहिती खोटी असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलाय. मुस्लिम आणि यादवांची संख्या जास्त दाखवण्यात आल्याचं ते म्हणाले आहेत. ते बिहारमधील एका सभेत बोलत होते.

नागपूरातील सीताबर्डी परिसरात अजय गारमेंट आणि पदम जनरलला मोठी आग

दिवाळी आणि सणासुदीचा काळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजारात गर्दी आहे... यावेळी दुकानाच्या एका कोपऱ्यात आग लागली असताना लक्षात येताच आज विझवण्याचा प्रयत्न सुरू केला... मात्र दुकानातील साहित्याने लगेच पेट घेतला आणि दुकान आगेच्या कवेत सापडले, अजय गारमेंटचे दुकान चालक दीपक चौरसिया यांनी सांगितलं.

घटनास्थळी अग्निशमन विभागाचे तीन बंब आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहे मात्र कापड असल्यामुळे ही आज झपाट्याने वाढत चालली असून लगतच्या दुकानांमध्ये आग पसरण्याची सुद्धा भीती निर्माण झाली आहे...

एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. साम टीव्हीने यासंदर्भातील बातमी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ हवाई रुग्णवाहिकेची सोय करुन दिली आहे. 

नगरमध्ये मतदान कक्षाबाहेर मतदाराचा हृदयविकाराने झटक्याने मृत्यू

मतदानाच्या दिवशी अहमदनगरमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. अहमदनगरच्या करंजीत मतदानानंतर एका व्यक्तीचा हृदयविकाराने धक्क्याने मृत्यू झाला आहे.सुनील गांधी असे मृत्यू झालेल्या मतदाराचे नाव आहे. मतदान कक्षाच्या बाहेर आल्यानंतर सुनील गांधी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.गांधी यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र त्यांचा तत्पूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरने सांगितले.

रायगड ग्रा.पं.निवडणूक स.11 पर्यंत 19.58 टक्के मतदान

ग्रामपंचायत निवडणूकीत आतापर्यंत स. साडे नऊ ते साडे अकरा पर्यंत 19.58 टक्के मतदान झालं आहे. परभणी जिल्ह्यातील 3 सार्वत्रिक ग्रामपंचायत आणि 8 पोटनिवडणुकीसाठी सकाळी 7:30 ते 11:30 पर्यंत 37.81 टक्के इतका मतदान झाले आहे.

सांगली जिल्ह्यात दु. 1 वाजेपर्यंत 33 टक्के मतदान

सांगली जिल्ह्यातील 83 ग्रामपंचायती आणि 81 सरपंच पदासाठी मोठ्या चुरशीने मतदान सुरू आहे,दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्ह्यात 33 टक्के मतदानाची नोंद झाली असून शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

भाजपने राजस्थान विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 उमेदवारांची यादी केली जाहीर

भारतीय जनता पक्ष (BJP) ने राजस्थान विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

अमरावतीमध्ये मतदानाच्या दरम्यान राडा, दोन गट भिडले आपसात

आज राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान होत आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील कारला येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानादरम्यान मतदान केंद्रावर दोन गटात तुफान राडा झाला आहे. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत वाद सोडवला आणि दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलं.

काटेवाडीत अजित पवार गट आणि भाजपचा एकमेकांवर पैसे वाटल्याचा आरोप

काटेवाडी गावात अजित पवार गट आणि भाजप यांच्यात लढत होत आहे. दरम्यान दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच भाजपने अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. तर अजित पवार गटाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

अजित पवार आणि प्रफुल पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

अजित पवार आणि प्रफुल पटेलांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. गोंदिया विमानतळावर ही भेट झाली आहे. यावेळी प्रफुल पटेल आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये काही वेळ चर्चा देखील झाली आहे.

बावड्यात हर्षवर्धन पाटील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी करणार मतदान

भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,मुलगी अंकिता पाटील आणि पत्नी भाग्यश्री पाटील व मुलगा राजवर्धन पाटील मतदान करणार आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा! बावडा गावात हर्षवर्धन पाटलांची प्रतिष्ठा पणाला

इंदापूर तालुक्यातील ६ ग्रामपंचायत साठी आज मतदान पार पडणार आहे. भाजप नेते हर्षवर्धन पाटलांच्या बावडा ग्रामपंचायतसाठी देखील आज मतदान होणार आहे. बावडा गावात हर्षवर्धन पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

बावडा गावात हर्षवर्धन पाटील यांच्या पॅनल सोबत दत्तात्रय भरणे यांच्या राष्ट्रवादीच पॅनल आहे.बावडा गावात हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे अशी लढत होणार आहे. बावडा ग्रामपंचायत १७ जागांसाठी ५६ उमेदवार रिंगणात आहेत.

'माझ्या मुलाने मुख्यमंत्री व्हावे', अजित पवार यांच्या मातोश्रींनी व्यक्त केली इच्छा

माझे वय आता ८६ आहे. त्यामुळे माझ्या देखतच मुलाने मुख्यमंत्री व्हावे असे मला वाटते. लोकांचे त्याच्यावर प्रेम आहे. मात्र पुढचे काय सांगावे. बारामतीकरांचे काटेवाडीकरांचे दादा वर प्रेम आहे. पण बघू पुढे काय होते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी भावना व्यक्त केली.

काटेवाडी येथे रविवारी (ता. ५) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. यावेळी ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार व पत्नी सुनीता पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सकाळी साडेसातच्या दरम्यान हजेरी लावली होती. आशा पवार यांनीच येथे प्रथम मतदानाचा हक्क बजावला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, पूर्वीची काटेवाडी आणि आत्ताच्या काटेवाडी मध्ये खूप बदल झाला आहे. माझ्या सूनबाईने ग्रामस्थांच्या सहकार्याने हा बदल घडवला.

दादा उपमुख्यमंत्री कधी व्हावेत असे आपणास वाटते, असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता माझ्यासमोरच मुलाने मुख्यमंत्री व्हावे असे मला मनापासून वाटते लोकांचे त्याच्यावर प्रेम आहे पण बघू काय होते पुढचे काय सांगावे असेही आशा पवार यावेळी म्हणाल्या. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत बरी नसल्याने प्रथमच ते ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला हजर राहू शकले नाहीत.

राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. या ग्रामपंचायतीचा सोमवारी निकाल येणार आहेत. अजित पवार आणि भाजप यांच्यात पुणे जिल्ह्यातील काटेवाडीत सामना रंगणार आहे. देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vodafone Idea AGR dues : वोडाफोन-आयडियाला सरकारचा दिलासा, तरीही शेअर्स कोसळले!₹87,695 कोटींच्या AGR ला मुदतवाढ; नेमकं काय घडलं?

Zomato Swiggy Latest News : ‘गिग वर्कर्स’च्या संपासमोर ‘झोमॅटो-स्विगी’ झुकले! ‘ डिलिव्हरी पार्टनर्स’चा पगार वाढला

Dilip Walse Patil : 'अवसरी खुर्द शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ११० कोटींचे अत्याधुनिक कौशल्य विकास केंद्र उभारणार' – माजी गृहमंत्री वळसे पाटील!

Nanded News : नववर्ष २०२६ स्वागतासाठी शिस्त आणि सुरक्षिततेचे आवाहन; सिंदखेड पोलीस सक्रिय!

BMC Election: मुंबई महापालिकेसाठी वळणाचे वर्ष! निवडणूक रणशिंग, राजकीय समीकरणांची उलथापालथ आणि विकासकामांचा वेग

SCROLL FOR NEXT