Devendra Fadnavis  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : गडकरींची चिंता तुम्ही नका करू; देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर होईल, तेव्हा त्यांचे नाव पहिल्या यादीत असेल, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना गडकरींची चिंता करण्याची गरज नाही, असा टोला लगावला.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपचे मोठे नेते आहेत. जेव्हा महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर होईल, तेव्हा त्यांचे नाव पहिल्या यादीत असेल, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना गडकरींची चिंता करण्याची गरज नाही, असा टोला लगावला.

भाजपने जाहीर केलेल्या लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत नितीन गडकरी यांचे नाव नसल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांकडून भाजपवर टीका केली जात आहे.

अनेक जण त्यांचे तिकीट कापणार असल्याचाही दावा करीत आहेत. पहिल्या यादीत नाव नसल्याने गडकरी यांच्या उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चा शहरात सुरू आहेत. मोदी-शहा यांच्या धक्कातंत्राच्या राजकारणामुळे अनेक जण गडकरी यांच्या उमेदवारीबाबत तर्कवितर्क लावत आहेत.

या पार्श्वभूमीवर फडणवीस नागपूरमध्ये म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे. त्यांनी गडकरींना ऑफर देणे म्हणजे गल्लीतील नेत्याने अमेरिकेच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्याचा प्रकार आहे.

जागा वाटपासाठी थोडा वेळ थांबा. आम्ही सर्व अधिकृतपणे सांगणार आहोत. महायुतीत कोणीही नाराज नाही. आपल्या सहकाऱ्यांसाठी दावे हे करावेच लागतात. मेरिटनुसार व जिंकण्याची खात्री असलेल्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे.’’

सुळेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही

पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये गोळीबार झाला होता तसेच नागपूरमध्ये काही वर्षांपूर्वी गोवारी समाजावरही गोळीबार झाला तेव्हा राज्यात कोणाचे सरकार होते, असा प्रश्न उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना केला. सुळे विरोधी पक्षात आहेत म्हणून त्या टीका करतात. त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT