Maharashtra may face load shedding as Koyna hydro project stopped
Maharashtra may face load shedding as Koyna hydro project stopped 
महाराष्ट्र

महाराष्ट्र जाणार अंधारात; कोयना प्रकल्प पाण्याअभावी बंद

राजेश सोळसकर

सातारा : दुष्काळी परिस्थितीतमुळे संकटात सापडलेला महाराष्ट्र आता अंधारात जाण्याची शक्यताही आहे. महाराष्ट्राची वीजवाहिनी मानल्या जाणाऱया कोयना जलविद्युत प्रकल्पातून होणारी वीजनिर्मिती आजपासून पूर्णपणे बंद झाली आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार धरणाच्या व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला. याचा मोठा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे.  

कोयना धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर सातारा सिंचन मंडळ आणि जिल्हाधिकाऱयांनी वीजनिर्मिती बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणातील वीजनिर्मिती धरणातील अत्यल्प पाणीसाठा याचा विचार करून आजपासून बंद करण्यात आली. सातारा येथील सिंचन मंडळ आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढील आदेश येईपर्यंत कोयनेतील वीजनिर्मिती पूर्णपणे बंद करावी असा आदेश कोयना धरणाच्या अधीक्षक अभियंत्यांना काल एका मेलद्वारे दिला होता. त्यामुळे आज दुपारी ही वीज निर्मिती बंद करण्यात आली.

सातारा जिल्ह्यात या वर्षी तीव्र दुष्काळी स्थिती आहे कोयना धरणात काल अखेरपर्यंत केवळ अकरा टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता.

गेल्या काही दिवसांपासून वीज निर्मितीसाठीच्या पाण्याची कपात करावी याबाबत साताऱ्याचे जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानिर्मिती कंपनीची चर्चा सुरू होती. त्यानुसार जूनमध्ये कमीत कमी चार टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवावा आणि उरलेल्या पाण्याचे नियोजन वीजनिर्मितीसाठी करावे असा निर्णय नुकताच झाला होता.

महानिर्मिती कंपनीनेही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाने आजपासूनच पूर्णपणे वीजनिर्मिती बंद ठेवण्याचा आणि पुढील आदेश येईपर्यंत त्याची कार्यवाही करावी असा आदेश काढला आहे.

महानिर्मिती कंपनीची वीज निर्मितीची क्षमता 13602 मेगावॅट इतकी आहे. यापैकी 1956 मेगावॉट वीज निर्मिती कोयना जलविद्युत प्रकल्पातून होते. याचा अर्थ महाराष्ट्राची वीज निर्मितीची क्षमता सुमारे दोन हजार मेगावॉट अचानक कमी झाली आहे. परिणामी, येत्या काही दिवसात राज्याला अघोषित भारनियमनाला सामोरे जावे लागेल, अशी शक्यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील फास्ट फूडची दुकाने आगीत जळाली

SCROLL FOR NEXT