महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal:'ओबीसी प्रमाणपत्रासाठी खाडाखोड', मंत्री छगन भुजबळ यांचा दावा; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती बरखास्त करावी, अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केली.

सकाळ डिजिटल टीम

Chhagan Bhujbal On Maratha Reservation: जातीने कुणबी असलेल्यांना प्रमाणपत्र शोधून देण्यासाठी न्यायाधीश शिंदे यांची समिती स्थापन केली. निजामशाही आणि वंशावळीप्रमाणे पत्र मिळाली आहेत, त्यामुळे आता समितीचे काम संपले आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती बरखास्त करावी, अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केली. तसेच कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केल्यानंतर खाडाखोड करून प्रमाणपत्र मिळवले जात आहे, त्यास विरोध असल्याचा गंभीर आरोपही भुजबळ यांनी केला.

पुण्यातील शासकीय विश्रामगृहात भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भुजबळ म्हणाले, ‘‘निजामशाही आणि वंशावळप्रमाणे पत्र मिळाली आहेत, असे आपोआपच ओबीसीमध्ये समाविष्ट होतात. त्यानंतर त्यांची फक्त जातपडताळणी करून घेण्याचे काम शिल्लक राहते. जातीने कुणबी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र शोधून ते द्यावे अशी मूळ मागणी होती. त्यासाठी न्यायमूर्ती शिंदे यांची समिती स्थापन केली.

या समितीचे काम सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा पाच हजार कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याचे जाहीर केले. त्यानंतर साडेअकरा हजार झाले. पण ही समिती आता जिल्ह्याजिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र शोधत आहे, हे या समितीला सांगितलेले नव्हते. त्यामुळे समितीचे काम संपले असून, सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी आम्ही कधी मान्य केली नाही आणि करणारही नाही.’’(Latest Marathi News)

मराठवाड्यातील काही ठिकाणी पेनने खाडाखोड करून कुणबी नोंद करत आहेत. त्याचे पुरावे प्रकाश शेंडगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिले आहेत. खाडाखोड केलेल्यांना ओबीसीत सामावून घेतले जाणार नाही, असेही भुजबळ यांनी सांगितले.

भुजबळ म्हणाले...

  • मराठा ओबीसी नसल्याचे सर्वोच्‍च न्यायालयाने स्पष्ट केले आहे

  • मराठ्यांना हे आरक्षण दिल्यास कायद्यात टिकणार नाही

  • मी कोणत्याही जातीचा प्रचार करत नाही व कोणाचाही विरोधक नाही

  • मी केवळ ओबीसींच्या हक्कासाठी लढत आहे

  • बीड हल्ल्याच्या वेळी पोलिस हतबल का झाले याची चौकशी करावी

    (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samanvay Cafe: आरोग्यदायी डाएट अन् बनारसी कचोरी-जलेबीचा आस्वाद; चहाच्या घोटासोबत सुधारणार पोलीस-जनता 'संबंध'

Success Story: वयाच्या १७ व्या वर्षी उंचावली देशाची मान ! खेडेगावातील प्रणवला मिळाली ३.५५ कोटींची स्कॉलरशिप; गणितात ठरलाय 'वर्ल्ड टॉपर'

BADMINTON: ठाण्याच्या या बॅडमिंटन अकादमीची चर्चा थेट परदेशात! मालदीव, आयर्लंड, स्पेन अन् अमेरिकेतील खेळाडू प्रशिक्षणासाठी इथेच का येतात?

Marathi News Live Updates : सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आठ खासदार आज पंतप्रधान मोदींची घेणार भेट

Chhatrapati Sambhajinagar Airport Recruitment: विमानतळ भरतीच्या नावाखाली संभाजीनगरमध्ये विद्यार्थी वेठीस; परीक्षा घेणारेच गायब; केंद्रावर सोयी-सुविधांचाही अभाव

SCROLL FOR NEXT