Jitendra Awhad NCP MLA MLC Election Esakal
महाराष्ट्र बातम्या

MLC Election: १०० कोटी अन्… शरद पवारांच्या आमदाराने सांगितला फुटलेल्या मतांचा रेट

Jitendra Awhad: "काही आमदार पैशांच्या अमीषाला बळी पडले. स्वतःच्या राजकीय अस्तित्वाविषयी काळजी नाही; स्वतःच्या राजकारणाविषयी पुढे जाण्याची इच्छा नसेल तर त्याला कोण काय करणार?"

आशुतोष मसगौंडे

नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेत महायुतीने महाविकास आघाडीची मते फुटल्यामुळे एक अतिरिक्त जागा जिंकत सरशी साधली. यामध्ये 11 जागांपैकी भाजपने पाच, शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या.

या निवडणुकीत काँग्रेसची पाच ते आठ मते फुटल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फुटलेल्या आमदारांना 100 कोटींचा विकास निधी आणि पाच कोटी रुपये वेगळे मिळाल्याचा दावा केला आहे.

या निवडणुकीचा निकाल काल रात्री जाहीर झाला. त्यानंतर सर्वत्र महाविकास आघाडीच्या फुटलेल्या मतांचीच चर्चा होती. त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत फुटलेल्या आमदारांनी किती पैसे मिळाले याबाबात सांगितले आहे.

आव्हाड आपल्या पोस्टमध्ये म्हणाले,"आज विधान परिषदेच्या निवडणुकीत जी काही मते फुटली किंवा फोडण्यात आली, त्याचे एकमेव कारण म्हणजे पैसा आणि विकासनिधी. म्हणजे जनतेच्याच पैशाचा खेळ ! विकासनिधी हा कुणी स्वतःच्या घरातून आणत नाही. जनतेच्या करातून सरकारी तिजोरीत जमा झालेला पैसा हा विकासनिधी म्हणून वापरला जातो. पण, या सरकारने तेही जमविले नाही. या सरकारने फक्त कर्जाचा डोंगर उभा केला अन् त्या कर्जाच्या डोंगरातूनच हे पैसे काढले जात आहेत. म्हणजेच, जनतेच्याच खिशाला कात्री लावण्याचे काम केले जातेय.

आपल्या पोस्टमध्ये आव्हाड पुढे म्हणाले, "पाच कोटी रूपये आणि शंभर कोटी रूपयांची कामे, अशी ऑफर प्रत्येक आमदाराला दिली जात होती. काही पैशांच्या अमीषाला बळी पडले. स्वतःच्या राजकीय अस्तित्वाविषयी काळजी नाही; स्वतःच्या राजकारणाविषयी पुढे जाण्याची इच्छा नसेल तर त्याला कोण काय करणार?"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

SCROLL FOR NEXT