MLA Ganpat Gaikwad Esakal
महाराष्ट्र बातम्या

MLC Election: शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार करणारे भाजप आमदार विधान परिषदेच्या मतदानासाठी येणार तुरूंगाबाहेर

MLA Ganpat Gaikwad: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यावर गोळीबार केल्यामुळे सध्या तुरूंगात असेलेले भाजप आमदार गणपत गायकवाड विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी येणार आहेत.

आशुतोष मसगौंडे

काही महिन्यांपूर्वी उल्हासनगर पोलीस स्टोशनमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. तेव्हापासून तुरूंगात असलेले गणपत गायकवाड आता विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी तुरूंगाबाहेर येणार आहेत.

विधान परिषद निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी गायकवाड यांनी कल्याण अतिरिक्त जिल्हा न्यायालयाला विनंती अर्ज केला होता, तो मान्य करण्यात आला आहे.

न्यायालयाने दिलेल्या परवानगीनुसार आमदार गणपत गायकवाड आज सकाळी ९ वाजता तळोजा जेल मधून निघणार आहे. यावेळी त्यांना मोठ्या पोलिस बंदोबस्तात विधान भवनात आणले जाणार आहे. सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत विधिमंडळ कामकाजासाठी ते तुरूंगाबाहेर असणार आहे. दरम्यान या निवडणुकीत आमदार गणपत गायकवाड कोणाला मतदान करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात आत विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. यासाठी 12 उमेदवार मैदानात असल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. अशात आपल्या उमेदवाराशी कोणता दगा फटका होऊ नये यासाठी प्रत्येक पक्ष काळजी घेत आहे. यासाठी सर्वच पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे.

या निवडणुकीसाठी आज सकाळी 9 ते 4 या दरम्यान मतदान होणार असून, त्यानंतर मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे.

कोण आहेत गणपत गायकवाड?

फेब्रुवारीच्या सुरुवातीला भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरमधील हिल लाईन पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकांच्या कार्यालयात गोळ्या झाडल्या होत्या. यामध्ये महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर या प्रकरणात भाजप आमदारासह अन्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून आमदार गायकवाड तळोजा कारागृहात आहेत. गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT