MLC Election results 2024 
महाराष्ट्र बातम्या

MLC Election results 2024 : जयंत पाटील पराभूत! विधानपरिषदेचा निकाल जाहीर, मविआला मोठा धक्का

Maharashtra MLC Election results 2024 : या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा एक, ठाकरे गटाचा एक आणि शिंदे गटाचे दोन तर भाजपचे चार उमेदवार हमखास निवडून येतील असे मानले जात होते.

रोहित कणसे

विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी आज (१२ जुलै) रोजी मतदान पार पडले, यावेळी २७४ सदस्यांनी यावेळी मतदानाचा अधिकार बजावला यानंतर थोड्याच वेळात निवडणुकीचे निकाल देखील समोर आले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून शेकापचे उमेदवार जयंत पाटील पराभूत झाले आहेत. या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा एक, ठाकरे गटाचा एक आणि शिंदे गटाचे दोन तर भाजपचे चार उमेदवार हमखास निवडून येतील असे मानले जात होते.

विधान परिषद निवडणुकीतील विजयी उमेदवार

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर

काँग्रेस - प्रज्ञा सातव

भाजप - योगेश टिळेकर, परिणय फुके, पंकजा मुंडे, अमित गोरखे , सदाभाऊ खोत

शिवसेना (शिंदे गट) - कृपाल तुमाने, भावना गवळी

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) - मिलिंद नार्वेकर

या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली होती. घोडेबाजार टाळण्यासाठी सर्वच पक्षांकडून आपआपल्या आमदारांची 'फाइव्ह स्टार' हॉटेलमध्ये बडदास्त ठेवण्यात आली होती. भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) या ४ पक्षांनी आपापले आमदार वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेलांत ठेवले होते. काँग्रेस पक्षाने देखील आपल्या पक्षातील आमदारांची पंचतारांकीत बडदास्त ठेवली होती.

कोणत्या पक्षाकडं किती मतं होती?

भाजप १०३ + अन्य ७ एकूण : ११०

५ अपक्ष (रवी राणा, प्रकाश आवाडे, विनोद अग्रवाल, महेश बालदी, राजेंद्र राऊत)

रत्नाकर गुट्टे (रासप) आणि विनय कोरे (जनसुराज्य)

शिवसेना (शिंदे गट) ३८ + ६ अपक्ष : एकूण : ४४

६ अपक्ष- आशिष जैस्वाल, मंजुळा गावित, राजेंद्र यड्रावकर, गीता जैन, नरेंद्र बोंडेकर आणि किशोर जोरगेवार

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ४० + २ अपक्ष : ४२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT