Monsoon Update sakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: मान्सून दोन दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात; महाराष्ट्रात कधी दाखल होणार?

हवामान खात्याने दिली महत्वाची अपडेट

धनश्री ओतारी

मान्सून दोन दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात पोहोचला होता. सध्या मान्सूनने बंगालच्या उपसागरातील संपूर्ण परिसर व्यापला असून, तो पुढे अरबी समुद्राच्या दिशेने आगेकूच करत आहे. पुढच्या १ ते दोन दिवसात मान्सून अरबी समुद्रात दाखल होणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. (Maharashtra Monsoon Update )

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अंदमान निकोबार बेटांवर १९ जून पासून रेंगाळलेल्या नैऋत्य मान्सूनने अखेर वेग धरला आहे. येत्या १ ते २ दिवसात मान्सून मालदिव बेटे, कौमारिन क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील काही भागांत तसेच अरबी समुद्राच्या काही भागात हजेरी लावणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Monsoon Update

Weather Update

मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार?

५ जूनपर्यंत कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ईशान्येत मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पोहचू शकतो.Monsoon Update

मागील वर्षांच्या तुलनेत यावर्षी जून महिन्यात २५ टक्के कमी पाऊस पडण्याचा हवामान अंदाज आहे. दक्षिण-मध्य कोकणात सामान्य पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या वेळी जून महिन्यात तापमान एक-दोन अंशांनी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT