महाराष्ट्र

सहभागाविषयी प्रकाशकांमध्ये फूट? 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - बडोदा येथे होणाऱ्या 91 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात सहभागी होण्याच्या मुद्द्यावर प्रकाशकांमध्येच फूट पडल्याचे चित्र आहे. महाराष्ट्राबाहेर संमेलन होत असल्यामुळे आयोजकांनी ग्रंथप्रदर्शनासाठीच्या गाळ्यांचे भाडे कमी करावे, असे एका गटाचे म्हणणे आहे; तर संमेलन वर्षातून एकदाच होत असल्याने तसेच बडोद्यातील संमेलनामुळे महाराष्ट्राबाहेरील वाचकांपर्यंत पुस्तके थेट पोचवण्याची संधी असल्यामुळे व्यवसाय बाजूला ठेवून या संमेलनात सहभागी व्हायला हवे, अशी भूमिका काही प्रकाशकांनी घेतली आहे. दुसरीकडे भाड्यात फेरफार होणार नाहीत. प्रकाशकांनी साहित्याच्या सेवेसाठी काही वेळ व्यवसाय बाजूला ठेवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

या संमेलनातील ग्रंथप्रदर्शनातील गाळ्यांकरिता प्रकाशकांकडून तीन दिवसांसाठी चार हजार रुपयांचे भाडे आकारण्यात येणार आहे. ते एक हजार रुपयांनी कमी करावे, अशी मागणी प्रकाशकांचा एक गट करत आहे; तर साहित्यसेवा हा प्रकाशकाचा खरा धर्म आहे. त्यामुळे केवळ काही पैशांकडे पाहून संमेलनात सहभागी न होण्याचा विचार करू नये, असे आवाहन काही प्रकाशकांनी केले आहे. 

संमेलनासाठी होणारा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने निमंत्रित मान्यवरांनीही मानधनाची अपेक्षा करू नये, असे आवाहन यापूर्वी केले आहे. प्रकाशकांशी चर्चा करून यापूर्वी गाळ्यांचे भाडे सहा हजारांवरून चार हजार रुपये केले होते. ते अधिक कमी करणे शक्‍य होणार नाही. या संमेलनात प्रकाशकांनी व्यावसायिक दृष्टिकोन बाजूला ठेवून सहभागी व्हावे. 
दिलीप खोपकर, बडोदा साहित्य परिषद 

महाराष्ट्राबाहेर संमेलन असल्यामुळे राहण्यापासून प्रवास-वाहतूक खर्चाला येणारा खर्च मोठा आहे. पैशाचे सोंग आणण्यासारखे नाही. त्यामुळे गाळ्याचे भाडे एक हजाराने कमी करावे, अशी मागणी आहे. 
राजीव बर्वे, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ 

अधिकाधिक पुस्तके वाचकांपर्यंत पोचवणे, हा प्रकाशकांचा खरा धर्म आहे. त्यामुळे एक हजार रुपयांकडे पाहून प्रकाशकांनी संमेलनापासून तोंड फिरवू नये. आम्ही या संमेलनात सहभागी होणार आहोत. 
सुदेश हिंग्लापूरकर, विश्‍वस्त, ग्रंथाली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT