महाराष्ट्र

आळंदीत आजपासून कार्तिक वारी

सकाळवृत्तसेवा

आळंदी - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या आळंदीतील कार्तिकी वारीस शनिवारी (ता. ११) गुरू हैबतबाबांच्या पायरी पूजनाने सुरवात होईल. कार्तिक वद्य अष्टमी ते अमावस्येपर्यंत कार्तिकी वारी सोहळा चालणार असून, कार्तिकी एकादशी मंगळवारी (ता. १४) आणि माउलींचा संजीवन समाधी सोहळा गुरुवारी (ता. १६) आहे.

कार्तिकी वारीत हजेरी लावण्यासाठी राज्यभरातून वारकरी गेल्या दोन दिवसांपासून दाखल होऊ लागले आहेत. ठिकठिकाणी राहुट्या, तंबू, धर्मशाळांमध्ये हरिनामाचा जागर सुरू आहे. दरम्यान, उद्या (शनिवार) पहाटे पवमान अभिषेक, दुधारती झाल्यानंतर भाविकांच्या महापूजा होतील. त्यानंतर सकाळी सात ते नऊ या वेळेत देऊळवाड्याच्या महाद्वारातील गुरू हैबतबाबांच्या पायरी पूजनाने सोहळ्यास प्रारंभ होईल. पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांची या वेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. सायंकाळी साडेसहाला वीणा मंडपात योगिराज ठाकूर यांच्या वतीने मानाचे कीर्तन होईल. रात्री नऊ ते अकरा बाबासाहेब आजरेकर यांच्या वतीने कीर्तनसेवा होईल. रात्री दहा ते बारा हैबतबाबांच्या पायरीपुढे वासकर महाराजांच्या वतीने, त्यानंतर बारा ते दोन मारुतीबुवा कराडकर आणि दोननंतर आरफळकरांच्या वतीने जागराचा कार्यक्रम होईल.

कार्तिकी वद्य नवमी आणि दशमीला नेहमीप्रमाणे पवमान पूजा आणि कीर्तनाचे कार्यक्रम होतील. मुख्य कार्तिकी एकादशीचा सोहळा मंगळवारी (ता. १४) पहाटपूजेने सुरू होईल. दुपारी माउलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर सायंकाळी पुन्हा मंदिरात प्रवेश करेल. बुधवारी द्वादशीला प्रांताधिकारी आयूष प्रसाद यांच्या हस्ते शासकीय महापूजा माउलींच्या समाधीवर होईल. दुपारी चारनंतर माउलीचा चांदीचा मुखवटा रथात ठेवून रथोत्सव साजरा केला जाणार आहे. गुरुवारी (ता. १६) पहाटे दोन ते अडीच प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांच्या हस्ते महापूजा होईल. त्यानंतर साडेअकरापर्यंत भाविकांच्या व नामदेव महाराजांच्या वंशजांच्या हस्ते महापूजा होतील. त्यानंतर सकाळी सात ते नऊ हैबतबाबा पायरीपुढे आणि साडेसात ते साडेनऊ वीणा मंडपात कीर्तन सेवा होईल. त्यानंतर मुख्य समाधी सोहळ्यास सुरवात होईल. या वेळी सकाळी दहा ते बारा या वेळेत वीणा मंडपात माउलींच्या संजीवन समाधी दिनावर नामदास महाराजांचे कीर्तन होईल. त्यानंतर हैबतबाबा दिंडीची समाधी मंदिरात प्रदक्षिणा आणि घंटानाद झाल्यावर महानैवद्य होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT