महाराष्ट्र

287 विधानसभा सदस्यांचे राष्ट्रपती निवडणुकीत मतदान 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - राष्ट्रपतिपदासाठी आज विधानसभेच्या 288 पैकी 287 सदस्यांनी मतदान केले. एका राज्यसभा सदस्यानेही राज्यात मतदान केले. 

विधान भवनात सकाळी ठीक 10 वाजता सुरू झालेल्या या मतदानात पुण्यातील आमदार मेधा कुलकर्णी यांनी सर्वप्रथम मतदान केले. सुरळीत पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 11.25 वाजता मतदान केले. 

पहिल्या टप्प्यात एका तासात 85 मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. यात शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री मदन येरावार व विजय देशमुख यांचा समावेश होता. दुपारी 12 पर्यंत 191 जणांनी मतदान केले. यात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री रवींद्र वायकर, दादाजी भुसे आणि दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण 257 विधानसभा सदस्य तसेच राज्यसभा सदस्य संजय काकडे यांनी मतदान केले. यात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे तसेच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य सदस्यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी पाचपर्यंत संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांच्यासह 287 सदस्यांनी मतदान केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT