महाराष्ट्र बातम्या

देशातली सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा उद्या 

सकाळवृत्तसेवा

पुणे - उमलत्या कल्पनांचे इंद्रधनू खुलवणारी, शालेय विद्यार्थ्यांसाठीची देशातली सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा रविवारी (ता. 17) सकाळी महाराष्ट्र व गोव्यातील दोन हजारांहून अधिक शाळांमध्ये एकाच वेळी होत आहे. अन्य राज्यांतील आणि जगभरातले विद्यार्थीही ऑनलाइन स्पर्धेत सहभागी होत आहेत. 

शाळांद्वारे स्पर्धेत नावनोंदणी न करता आलेल्या मुला-मुलींना आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन स्पर्धेत भाग घेता येणार आहे. महाराष्ट्र आणि गोव्यात मिळून साठहून अधिक आदिवासी आश्रमशाळा आणि पन्नासहून अधिक विशेष मुलांसाठीच्या शाळाही या स्पर्धेत सहभागी होत आहेत. "सकाळ'च्या वाचकांच्या तीन पिढ्यांना जोडणारा आणि रंगरेषांचे आकर्षक विश्‍व खुले करत उमलत्या पिढीला सर्जनशीलतेच्या वाटेवर अलगद घेऊन जाणाऱ्या उपक्रमाचे हे 32 वे वर्ष आहे. 

यंदाची स्पर्धा पॉवर्ड बाय लव्ह इट चॉकलेट्‌स आणि एलआयसी असून, श्री चैतन्य टेक्‍नो स्कूल आणि जिंगल टून्स सहप्रायोजक, भारताचे अग्रगण्य ऑप्टिशियन्स गंगर आयनेशन आयकेअर पार्टनर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ पर्यावरण पार्टनर; तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कॉर्पोरेट पार्टनर आहेत. 

स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा आहे. मात्र, अजूनही नावनोंदणी केलेली नाही अशा विद्यार्थ्यांना; तसेच महाराष्ट्राबाहेरच्या विद्यार्थ्यांना chitrakala.esakal.com या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. 

स्पर्धेचा निकाल जानेवारी 2018 मध्ये प्रसिद्ध केला जाईल. त्यानंतर राज्यपातळीवरील; तसेच पुणे विभागीय पातळीवरील विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शन व पारितोषिक वितरण समारंभ पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे. 

चित्रे काढण्यासाठी कानमंत्र 
इंडिया आर्ट गॅलरीचे संस्थापक मिलिंद साठे यांनी स्पर्धकांसाठी उत्तम चित्र काढण्याचा कानमंत्र दिला आहे. 
- चित्र काढण्यासाठी तुम्ही काळी किंवा रंगीत पेन्सिली, क्रेयॉन्स (रंगीत खडू), पोस्टर कलर्स, ऍक्रालिक कलर्स, स्केच पेन्स इ. माध्यमांचा स्वतंत्र किंवा एकत्रित वापर करू शकता. 
- चित्र काढताना आकारांची मांडणी, लय, हावभाव, प्रमाणबद्धता याकडे लक्ष द्या. 
- तुमचे चित्र ही तुमची स्वतःची अभिव्यक्ती असली पाहिजे व कुठल्याही चित्राची प्रतिकृती असू नये. 
- चित्र दिलेल्या वेळेत पूर्ण करा. 
- चित्र काढताना नवनवीन पद्धतींचा वापर करून चित्रकलेतला आनंद घ्या. आपल्या मनातील भाव कागदावर उतरविण्याचा प्रयत्न करा. 
- स्पर्धेत भाग घेऊन मज्जा करा, आनंद लुटा. 
- सर्व स्पर्धकांना चित्रनिर्मितीसाठी शुभेच्छा! 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT