Negligence Alleged in Newborn Death at Washim District Hospital  esakal
महाराष्ट्र बातम्या

Washim : प्रसूतीवेदनांनी विव्हळत होती महिला; डिलिव्हरीवेळी केली मारहाण, पोटावर दाब अन् बाळाचा मृत्यू, वाशिम रुग्णालयात नेमकं काय घडलं?

Woman Mistreated During Childbirth Newborn Dies in Washim Hospital : वाशिम जिल्हा रुग्णालयात हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेसोबत अमानुष वागणूक झाली. यामध्ये नवजात बालकाचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी डॉक्टरांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

Saisimran Ghashi

  • वाशिम जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीमुळे शिवानी गव्हाणे यांच्या नवजात बालकाचा मृत्यू.

  • गर्भवती महिलेला तासन्तास वेदनांमध्ये सोडून अमानुष वागणूक दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप.

  • कुटुंबीयांनी जबाबदार डॉक्टरांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

महाराष्ट्रातील वाशिम जिल्हा महिला रुग्णालयात एका गर्भवती महिलेवर अमानुष वागणूक आणि हलगर्जीपणामुळे तिच्या नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, कुटुंबीयांनी जबाबदार डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

ही घटना २ ऑगस्टला घडली, जेव्हा पालसखेड येथील शिवानी वैभव गव्हाणे यांना पहाटे ३ वाजता प्रसूतीसाठी वाशिम जिल्हा महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर सर्व काही सामान्य असल्याचे सांगितले आणि सकाळी १० वाजेपर्यंत प्रसूती होईल, असे आश्वासन दिले. मात्र, शिवानी यांना रात्रीपासून तीव्र प्रसववेदना होत असताना आणि कुटुंबीयांनी वारंवार विनंती करूनही, सकाळी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोणत्याही डॉक्टर किंवा परिचारिकेने त्यांची तपासणी केली नाही, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

कुटुंबीयांचा दावा आहे की, शिवानीला प्रसूतीदरम्यान अमानुष वागणूक देण्यात आली. “तिला थोबाडीत मारण्यात आले, पोटावर जबरदस्तीने दाब देण्यात आला आणि अयोग्य कर्मचाऱ्यांनी तपासणी केली,” असे कुटुंबीयांनी सांगितले. सायंकाळी ५.३० वाजता प्रसूती झाली, परंतु डॉक्टरांनी नवजात बालकाला हृदयाची धडधड नसल्याचे सांगितले आणि त्याला मृत घोषित केले.शिवानी यांच्या सासू लता गव्हाणे यांनी रुग्णालय प्रशासनावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवला. “डॉक्टर आणि परिचारिकांच्या निष्काळजीपणामुळे आमचे बाळ गमावले.

आमच्या सूनेची तासन्तास वेदनांमध्ये तडफड होत होती,” असे त्यांनी सांगितले. सासरे ज्ञानेश्वर गव्हाणे म्हणाले, “आम्ही सकाळपासून सायंकाळपर्यंत कर्मचाऱ्यांना विनवणी करत होतो, पण कोणीच ऐकले नाही. दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.”या घटनेने स्थानिक समाजात संतापाची लाट पसरली असून, रुग्णालय प्रशासनावर तातडीने चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

FAQs

  1. What happened at Washim District Women’s Hospital?
    वाशिम जिल्हा महिला रुग्णालयात काय घडले?

    शिवानी गव्हाणे यांना प्रसूतीसाठी दाखल केले असता, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तीव्र वेदनांमध्ये तासन्तास तडफडत राहिल्या आणि नवजात बालकाचा मृत्यू झाला.

  2. Why is the family demanding action against the hospital staff?
    कुटुंबीय रुग्णालय कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी का करत आहेत?

    रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी शिवानी यांना तपासणीशिवाय तासन्तास वेदनांमध्ये सोडले आणि अमानुष वागणूक दिली, ज्यामुळे बाळाचा मृत्यू झाला.

  3. What specific allegations did the family make about the treatment?
    कुटुंबीयांनी उपचारांबाबत कोणते विशिष्ट आरोप केले?

    शिवानी यांना थोबाडीत मारण्यात आले, पोटावर जबरदस्तीने दाब देण्यात आला आणि अयोग्य कर्मचाऱ्यांनी तपासणी केली, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

  4. When did the incident occur, and what was the outcome?
    ही घटना केव्हा घडली आणि त्याचा परिणाम काय झाला?

    २ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजता दाखल झालेल्या शिवानी यांची प्रसूती सायंकाळी ५.३० वाजता झाली, परंतु नवजात बालकाला मृत घोषित करण्यात आले.

  5. What action is the family seeking?
    कुटुंबीय कोणती कारवाई मागत आहेत?

    कुटुंबीयांनी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई आणि चौकशीची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: दुसरी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी काय सिद्ध केलं? निवडणूक आयोगाला दिलेला अल्टिमेटम नेमका काय आहे?

Pune Encroachment : शहरातील हजारो चौरस फुटावरील अतिक्रमण हटवले

Teachers Award : १०९ शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर; पुणे जिल्ह्यातील सहा शिक्षकांचा समावेश

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT