Mumbai High Court Sakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai High Court : तृतीयपंथी, समसंभोगी यांच्याबाबत पोलीस संवेदनशील होतील का?

तृतीयपंथी तसेच समसंभोगी (गे, लेस्बियन इ.) यांच्याशी वर्तणूक करताना पोलीस संवेदनशील राहतील यासाठी महाराष्ट्र पोलीस मॅन्युअलमध्ये बदल करता येतील का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने आज केली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - तृतीयपंथी तसेच समसंभोगी (गे, लेस्बियन इ.) यांच्याशी वर्तणूक करताना पोलीस संवेदनशील राहतील यासाठी महाराष्ट्र पोलीस मॅन्युअलमध्ये बदल करता येतील का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने आज केली.

न्या. श्रीमती रेवती मोहिते डेरे आणि न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने यासंदर्भात पोलीस महानिरीक्षकांकडून (तुरुंग) सूचनाही मागवल्या आहेत. दोन्ही महिला असलेल्या एका जोडप्याने सादर केलेल्या तक्रारीवर खंडपीठाने हा आदेश दिला. या त्यांच्या नातेसंबंधांना त्यांच्यापैकी एका पालकाने आक्षेप घेत आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली होती. त्यामुळे ही याचिका सादर झाली.

यासंदर्भात मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तामिळनाडूमधील तुरुंगांमधील कैद्यांबाबत पोलिसांना संवेदनशील करणारा उपक्रम राबवण्यात आल्याचे अर्जदारांच्या वकिलांनी दाखवून दिले. त्यामुळे न्यायालयाने महाराष्ट्रातही पोलीस मॅन्युअल मध्ये असे बदल करता येतील का याची विचारणा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रॉपर्टीची दस्त नोंदणी १५ दिवसांत! तक्रार आल्यास मंडलाधिकाऱ्यांना निकालासाठी तीन महिन्याची मुदत; तक्रारदारास प्रांताधिकाऱ्यांकडे अपिलाचाही अधिकार

आजचे राशिभविष्य - 02 एप्रिल 2026

Ragi Masala Chilla Wrap : झटपट तयार होणारा, पौष्टिक अन् चविष्ट 'रागी मसाला चिला रॅप'; दिवसाची सुरुवात करा एनर्जेटिक नाश्त्याने! लगेच लिहून घ्या सोपी रेसिपी

Panchang : 2 एप्रिल पंचांग विशेष! हनुमान जयंती, पौर्णिमा आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश! एप्रिलमध्येच ‘आरटीई’ची लॉटरी; सोलापूर जिल्ह्यात २७८२ जागांसाठी ६ हजार ७०९ विद्यार्थ्यांचे अर्ज, वाचा...

SCROLL FOR NEXT