MNS leader Raju Patil Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : 'राजकारणाशी संबंध नाही' म्हणत मनसे आमदाराने घातलं कोडं

कमेंट्समध्ये अनेकजण हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

वैष्णवी कारंजकर

राज्याच्या राजकारणामध्ये सध्या वेगाने घडामोडी होत आहेत. ठाकरे, शिंदे, फडणवीस, पवार या राजकारणातल्या प्रमुख नावांभोवती सध्याचं राजकारण फिरत आहे. अशातच मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.

पाटील यांनी केलेली ही पोस्ट म्हणजे एक कोडंच आहे आणि कमेंट्समध्ये नेटकरी या कोड्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पाटील आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, "A चं B वर प्रेम होतं, C चं D वर, मग D ला वाटलं A हा C पेक्षा जास्त better आहे. पण B त्याच्यावर अन्याय करतोय. A ने C ला विचारलं सोबत येणार का? C म्हणाला माझं आणि B चं पटणार नाही. आणि D काड्या घालेल. A म्हणाला मी तिकडे येतो. D ला काही problem नसेल ना. B काड्या घालून किती घालणार ?"

या पोस्टचा राजकारणाशी काही संबंध नाही, असंही पाटील यांनी पुढं म्हटलं आहे. तसंच एक लेखक मालिकेची गोष्ट ऐकवत होता. शेवट होता, M चा पर्याय स्वीकारला गेला, असंही या पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे. आता या पोस्टचा राजकारणाशी संबंध नाही, असं पाटील यांनी स्पष्टच म्हटलं आहे. त्यामुळे ही पोस्ट कोणाला उद्देशून केली आहे, याची चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

''तर तोंड काळं करायची वेळी आली असती'', राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT