Corona Updates News  esakal
महाराष्ट्र बातम्या

Corona : मुंबईत हजारांवर तर, राज्यात 2,369 कोरोना बाधितांची नोंद

सध्या राज्यात 25,570 सक्रिय रुग्ण असून, यातील सर्वाधिक 12,479 सक्रीय रूग्ण हे मुंबईतले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात गेल्या 24 तासात 2369 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली असून, 1402 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, चोवीस तासात पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. आज नोंदवण्यात आलेल्य एकूण रूग्णांपैकी 1062 रूग्ण हे केवळ एकट्या मुंबईतील असल्याने प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. (Maharashtra Corona Update News In Marathi)

राज्यात सध्या रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.83 टक्क्यांवर (Corona Recovery Rate) नोंदवण्यात आले असून, मृत्यूदर 1.85 टक्के इतका झाला. सध्या राज्यात 25,570 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यातील सर्वाधिक 12,479 सक्रीय रूग्ण हे मुंबईतले असून, त्यानंतर ठाण्यात 5871 सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. तर दुसरीकडे देशात गेल्या 24 तासांत 17 हजार 73 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून, 21 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

देशात सध्या 94 हजारांहून अधिक रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार घेत असून, 24 तासांत देशात 15 हजार 208 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.57 टक्क्यांवर पोहोचले असून, दैनंदिन रुग्ण सकारात्मकता दर 5.62 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोना महामारी सुरु झाल्यास आतापर्यंत भारतात 5 लाख 25 हजार 20 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : 'महाराष्ट्रात फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण सुरू आहे'; राज ठाकरेंची टीका

कमळीचे रिअर लाईफ वडिल पाहिलेत का? लेक दिसते सेम टू सेम आई सारखी, वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम एकत्र पोहचलं कुटुंब

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT