Corona Update  sakal media
महाराष्ट्र बातम्या

Corona : राज्यात आजही कोरोना चार हजार पार; मुंबईकारांनी चिंता वाढवली

राज्यात आज 3047 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 24 तासांत कोरोनामुळं तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात सलग तीन दिवसांपासून नव्या कोरोना बाधितांची संख्या चार हजारांच्यावर आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. तर, दुसरीकडे गेल्या 24 तासांत राज्यात 4,165 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली असून, एकट्या मुंबईत 2,255 रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यात आज 3047 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 24 तासांत कोरोनामुळं तीन जणांचा मृत्यू झाला आहे. (Maharashtra Corona Update)

राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 86 टक्क्यांवर नोंदवण्यात आले असून, मृत्यूदर 1.86 टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात 21,749 कोरोनाच्या सक्रिय रूग्ण असून, मुंबईत सर्वाधिक म्हणजे 13,304 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालेखाल ठाण्यात 4,442 इतके सक्रिय रुग्ण आहेत.

तर देशात गेल्या 24 तासांत 12 हजार 847 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून, 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, 7 हजार 985 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT