RTE admissions
RTE admissions esakal
महाराष्ट्र

RTE Admission : आरटीई प्रवेशाला मुदतवाढ नाही; राज्यातील ४० हजार, तर पुण्यातील ६,४२४ प्रवेश रखडले

सम्राट कदम

राज्यातील शिक्षण हक्का कायद्या अंतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेशाची प्रक्रिया अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे.

पुणे - राज्यातील शिक्षण हक्का कायद्या अंतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेशाची प्रक्रिया अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. निवड झालेल्या ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांपैकी मंगळवार (ता.९) पर्यंत केवळ ५४ हजार विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले आहेत. अजूनही सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले असून त्यासाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, ही मुदतवाढ शेवटची असेल, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातही सहा हजार ४२४ प्रवेश रखडले आहेत.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी आरटीई प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन सोडत (लॉटरी) पाच एप्रिल रोजी काढण्यात आली असून, निवड यादीतील बालकांचे प्रवेश आठ मेपर्यंत घ्यायचे होते. मात्र, अजूनही हजारो विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती झाली नसल्यामुळे ही अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.

अर्ज १५ मे पूर्वी निकाली काढा

प्रलंबित असलेल्या प्रवेशाबाबतच्या तक्रारी व अपील अर्जाबाबत सुनावणी घेवून १५ मे पूर्वी निकाली काढण्यात यावीत, अशा सुचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानंतर २०२३ २४ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन सोडतीद्वारे निवड झालेल्या प्रतिक्षा यादीतील बालकांच्या प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे, असेही गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.

आरटीई प्रवेशाची सद्यस्थिती -

तपशील - राज्य - पुणे जिल्हा

- एकूण राखीव जागा - १ लाख १ हजार ८४६ - १५ हजार ५९६

- एकूण अर्ज - ३ लाख ६४ हजार ४१३ - ७७ हजार ५३१

- प्रवेशासाठी निवड - ९४ हजार ७०० - १५ हजार ५०१

- प्रवेश निश्चित (दि. ९ मेपर्यंत) - ५३ हजार ९३६ - ९ हजार ७७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Freedom At Midnight: 'फ्रिडम एट मिडनाइट' चा फर्स्ट लूक आऊट; जवाहरलाल नेहरूंच्या भूमिकेत 'हा'अभिनेता

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SCROLL FOR NEXT