ST-Bus
ST-Bus sakal media
महाराष्ट्र

ST Bus : लालपरी धावणार ‘सीएनजी’वर

सकाळ वृत्तसेवा

आता लालपरीचा डिझेलवरचा ‘प्रवास’ संपणार असून लवकरच ती ‘सीएनजी’वर धावणार आहे.

- प्रसाद कानडे

पुणे - आता लालपरीचा डिझेलवरचा ‘प्रवास’ संपणार असून लवकरच ती ‘सीएनजी’वर धावणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने डिझेलवर धावणाऱ्या एसटी बसेसचे रूपांतर सीएनजीवर धावणाऱ्या गाडीत केले आहे. हा बदल योग्य असून त्यात कोणत्याही प्रकारचा दोष नसल्याने ही एसटी प्रवासी सेवेत धावण्यासाठी योग्य असल्याची मंजुरी हरियाना येथील आयकॅट (इंटरनॅशनल सेंटर फॉर ॲटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी) संस्थेने दिली. त्यामुळे लालपरी सीएनजीवर धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात लवकरच एक हजार एसटी बस ‘सीएनजी’वर धावताना दिसतील.

शहरी भागापुरतीच सेवा

राज्यात ‘सीएनजी’चा सर्वदूर पुरवठा नसल्याने राज्य परिवहन महामंडळाने ज्या ठिकाणी सीएनजी पुरवठा होईल, त्याच ठिकाणी ही सेवा देण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात डिझेलवर धावणाऱ्या एक हजार एसटीचे रूपांतर ‘सीएनजी’मध्ये केले जाईल. केवळ शहरी भागापुरतीच ही सेवा असेल. या प्रक्रियेसाठी तसेच डेपोमध्ये ‘सीएनजी’ पुरवठा करण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे.

आयकॅट संस्थेकडून राज्य परिवहन महामंडळाला ‘सीएनजी’वर धावण्यास एसटी बस सक्षम असल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे. आरटीओ प्रशासनाकडे गाडीची योग्यता प्रमाणपत्र घेतानाची चाचणी सुरू आहे. त्यांच्याकडून प्रमाणपत्र मिळताच एक हजार डिझेल बसचे सीएनजीमध्ये रूपांतर केले जाईल.

- शेखर चन्ने, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, राज्य परिवहन महामंडळ, मुंबई

महामंडळाचा ‘यू टर्न’

राज्य परिवहन महामंडळाने इलेक्ट्रिक बसची खरेदी केल्यावर ‘सीएनजी’वर बसखरेदीचा निर्णय घेतला. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. दापोडीच्या कार्यशाळेत त्या बसची प्रतिकृती तयार केली. याशिवाय, राज्यात ‘सीएनजी’चा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांसोबत चर्चा केली. मात्र, अचानक सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांची क्षमता कमी आहे. तसेच राज्यांत सीएनजीचा सर्वदूर पुरवठा नसल्याचे कारण सांगत सीएनजीवर सेवा न देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता त्या निर्णयावरून परिवहन महामंडळाने ‘यू टर्न’ घेतला आहे.

‘आयकॅट’कडून मंजुरी

आयकॅट ही हरियाना येथील मनेसारस्थित आंतरराष्ट्रीय स्तरांवरील वाहन क्षेत्राशी निगडित संस्था आहे. एसटी प्रशासनाने दापोडीच्या कार्यशाळेत एसटीतील डिझेलवरील इंजिनमध्ये बदल करून ती सीएनजीवर धावेल, अशी रचना केली. जानेवारी २३ मध्ये ही एसटी आयकॅटमध्ये परीक्षण व मंजुरीसाठी दाखल झाली. विविध प्रकारच्या चाचण्या घेऊन ही एसटी सीएनजीवर धावण्यास सक्षम असल्याचे प्रमाणपत्र परिवहन महामंडळाला देण्यात आले आहे.

राज्य परिवहन महामंडळाची स्थिती

  • १६ हजार राज्यातील एसटी बस

  • १२ लाख लिटर दैनंदिन डिझेलचा वापर

  • १४.५० कोटी रुपये रोजचे उत्पन्न

  • १० कोटी रुपये डिझेलवर होणारा रोजचा खर्च

  • वर्षाचा डिझेलचा खर्च ३ हजार कोटी रुपये

  • एकूण विभाग ३७

  • एकूण डेपो २५०

पुणे विभाग

  • ८५० - एसटी बस

  • १३ - एकूण आगार

  • १,४०,००० - दिवसभरातील प्रवासी संख्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT