sugar sugar
महाराष्ट्र बातम्या

राज्यात 45.77 लाख टन साखर उत्पादन

चालू गळीत हंगामात राज्यातील 189 साखर कारखान्यात 31 डिसेंबरअखेर 45.77 लाख टन साखर उत्पादन झाले आहे.

प्रदीप बोरावके

माळीनगर (सोलापूर) : चालू गळीत हंगामात राज्यातील 189 साखर कारखान्यात 31 डिसेंबरअखेर 45.77 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत ते 5.91 लाख टनांनी अधिक आहे.महाराष्ट्राने यावर्षी गाळप हंगामाच्या प्रारंभीपासूनच साखर उत्पादनात आघाडी कायम ठेवली असून उत्तरप्रदेशच्या तुलनेत राज्यात आतापर्यंत दीडपट साखर उत्पादन जास्त झाले आहे.देशाच्या यंदाच्या आतापर्यंतच्या एकूण साखर उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 40 टक्के इतका आहे.

देशात 492 साखर कारखान्यात 31 डिसेंबरपर्यंत 115.55 लाख टन साखर तयार झाली आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा देशात आतापर्यंत 4.81 लाख टन साखरेचे उत्पादन अधिक झाले आहे.इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे.उत्तरप्रदेशात गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी 2.76 लाख टन साखर उत्पादन कमी झाले आहे.कर्नाटकात मागील वर्षीच्या तुलनेत चालू हंगामात 1.49,गुजरातमध्ये 0.15,आंध्रप्रदेश व तेलंगणात 0.11 लाख टन तर तामिळनाडूत 19 हजार टन साखर उत्पादन अधिक झाले आहे.बिहारमध्ये यावर्षी 1.94,हरियाणा व पंजाबमध्ये प्रत्येकी 1.40,उत्तराखंडमध्ये 1.23 तर मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये 1.40 लाख टन साखर उत्पादन झाले आहे.

जानेवारीअखेरीस 'इस्मा'चा दुसरा सुधारित अंदाज-

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात 'इस्मा'तर्फे देशातील शिल्लक ऊसक्षेत्राची उपग्रहाद्वारे छायाचित्रे घेतली जाणार आहेत.त्याआधारे गाळपाचा शिल्लक राहिलेला ऊस,साखर उताऱ्याची स्थिती,ऊसाच्या एकरी उत्पादनाची टक्केवारी यावरून इस्माच्यावतीने जानेवारीअखेरीस साखर उत्पादनाचा दुसरा सुधारित अंदाज वर्तविला जाणार आहे.चालू हंगामात देशात नोव्हेंबरपर्यंत 47.50 लाख टन साखरेची विक्री झाली आहे.गतवर्षी या कालावधीपर्यंत 45.61 लाख टन साखर विक्री झाली होती

प्रमुख राज्यातील 31 डिसेंबरअखेरची साखर उत्पादनाची स्थिती (लाख टनामध्ये)-

राज्य कारखाने सुरू साखर उत्पादन

  • महाराष्ट्र 189 45.77

  • उत्तरप्रदेश 119 30.90

  • कर्नाटक 69 25.65

  • गुजरात 15 3.5

  • आंध्र व तेलंगणा 12 1.05

  • तामिळनाडू 15 0.92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Match Ban: मोठी बातमी! पाकिस्तानी खेळाडू भारतात येऊ शकतील, पण...; भारत-पाकिस्तान सामन्यांवर सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Tamil Nadu political drama विजयसमोर पेच! सत्तास्थापनेचा दावा केला पण बहुमतच नाही; राज्यपालांनाही विश्वास नाही, जादुई आकडा कसा गाठणार TVK?

Stray Dog : देगलूरात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याचा उच्छाद; पंधरा ते सोळा नागरिक जखमी, नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनाही चावा

चक्क ४९% Gen Z लोक फसवणुकीच्या जाळ्यात अडकता-अडकता वाचले; लिंक्डइनचा इशारा, नोकरी शोधताना 'हे' चुकीचे संकेत ओळखा

बंगाल-तमिळनाडू निकालांचा महाराष्ट्रात धसका! 'खाती नीट सांभाळा, काम करा नाहीतर...'; फडणवीसांचा मंत्र्यांना कडक इशारा

SCROLL FOR NEXT