Raj-Thackeray
Raj-Thackeray 
महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : आदित्यच्या उमेदवारीत गैर काय? - राज ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क

विधानसभा 2019 : मुंबई - आदित्य ठाकरे माझ्या कुटुंबातीलच व्यक्‍ती आहे. त्यामुळे वरळी मतदारसंघात उमेदवार न देण्याचा माझा निर्णय योग्य होता, असे स्पष्टीकरण मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले. राष्ट्रीय तसेच प्रादेशिक वृत्तवाहिन्यांच्या मुलाखतीत त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक लढविण्यावर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. आदित्य ठाकरे असो किंवा माझा मुलगा अमित ठाकरे, त्यांना जर वाटत असेल निवडणूक लढवावी तर नाही का म्हणायचे, असा सवाल राज यांनी केला. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे व्यंग्यचित्रकार होते. त्यांनी त्यांचे म्हणणे उद्धव आणि माझ्यावर लादले नाही. आमच्यावर असे संस्कार असतील, तर आमच्या मुलांना निवडणूक लढवावी, असे वाटत असेल, तर त्यात गैर नाही,’ अशा शब्दांत राज यांनी भूमिका स्पष्ट केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT