maharashtra weather update rain forecast monsoon heavy rainfall farmer agriculture esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Rain Update : पूर्व विदर्भामध्ये दमदार पाऊस; गोंदियात अतिवृष्टी

पूर्व विदर्भात दमदार पावसाने हजेरी लावली असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पूर्व विदर्भात दमदार पावसाने हजेरी लावली असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. रविवारी (ता. १६) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सावळी येथे सर्वाधिक १४० मिलिमीटर, नागभिड येथे १२० मिलिमीटर, तर गडचिरोली येथे ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. घाटमाथ्यावरही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.

रविवारी (ता. १६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत पडलेला पाऊस, (मि.मी.) कोकण : मुरबाड, तळा, शहापूर, वाडा प्रत्येकी ५०, वैभववाडी ४०, अंबरनाथ, जव्हार, माथेरान, राजापूर प्रत्येकी ३०.

मध्य महाराष्ट्र : गगनबावडा, अक्कलकुवा, इगतपुरी, राधानगरी, लोणावळा प्रत्येकी ५०, पाचोरा, महाबळेश्‍वर, पेठ, शाहूवाडी, हर्सूल प्रत्येकी ४०, ओझरखेडा, शिरपूर प्रत्येकी ३०.

मराठवाडा : खुलताबाद, परभणी प्रत्येकी ३०, सेनगाव, भेकरदन प्रत्येकी २०.

विदर्भ : सावळी १४०, नागभिड १२०, गडचिरोली ११०.

सेल्फीच्या नादात चार तरुण बुडाले

नागभीड (जि. चंद्रपूर) : घोडाझरी तलावात पार्टीसाठी गेलेले चार तरुण सेल्फी काढण्याच्या नादात तलावात बुडाले. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. मनीष श्रीरामे (वय २६), धीरज झाडे (२७), संकेत मोडक (२५) आणि चेतन मांदाडे (१७) अशी बुडालेल्या तरुणांची नावे असून, ते सर्व वरोरा तालुक्यातील शेगाव येथील रहिवासी आहेत. त्यापैकी एकाचा मृतदेह मिळाला असून, उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे.

राज्यातील पाऊस

  • अकोल्यात रिमझिम पाऊस सुरू

  • नागपुरात पावसाची हजेरी

  • नाशिक, सोलापूर जिल्ह्यांत हलक्या सरी

  • कोल्हापूर जिल्ह्यात पश्‍चिमेकडे पाऊस

  • जळगावमध्ये मध्यम, धुळ्यात तुरळक सरी

  • परभणी, हिंगोलीत ढगाळ वातावरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT