mahavitaran esakal
महाराष्ट्र बातम्या

‘महावितरण’ची पुन्हा वसुली मोहीम! पुणे विभागात १२००० कोटींची थकबाकी; १२.४४ लाख शेतकरी हिटलिस्टवर

शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने नवीन कृषिपंप धोरण-२०२० तयार केले आहे. त्याअंतर्गत ३१ मार्च २०२३ पर्यंत थकबाकी भरणाऱ्यांना थकबाकीवर ३० टक्के सूट मिळणार आहे. तसेच विलंब आकार व व्याज पूर्णतः माफ होईल. या धोरणाची अंमलबजावणी जानेवारी २०२१ पासून केली जात आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : डिसेंबर २०२२ अखेर ‘महावितरण’च्या पुणे प्रादेशिक विभागातील साडेबारा लाख कृषिपंप वीज ग्राहकांकडे १२ हजार ६१ कोटींची थकबाकी आहे. शेतकऱ्यांनी त्वरित वीजबिल भरावे, असे आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासनाने नवीन कृषिपंप धोरण-२०२० तयार केले आहे. त्याअंतर्गत ३१ मार्च २०२३ पर्यंत थकबाकी भरणाऱ्यांना थकबाकीवर ३० टक्के सूट मिळणार आहे. तसेच विलंब आकार व व्याज पूर्णतः माफ होईल. या धोरणाची अंमलबजावणी जानेवारी २०२१ पासून केली जात आहे. जानेवारी २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत ५० टक्के सूट देण्यात आली होती. आता एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत ३० टक्के सूट मिळणार आहे.

राज्यात कृषीपंपासाठी सगळ्यात जास्त वीजेचा वापर पुणे प्रादेशिक विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यात होतो. लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविणारे श्रीमंत शेतकरी या भागात आहेत. महागडी चारचाकी वाहन वापरणारे, बंगल्यात राहणारे व नियमित आयकर भरणारे शेतकरी असूनही ‘महावितरण’चे वीजबिल मात्र भरत नाहीत.

या पाचही जिल्ह्यात कृषीपंपासाठी विजेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून ऊस, फळबागा, भाजीपाला व फुलशेती, यासाठी वीजेचा भरपूर वापर करणाऱ्या सधन शेतकऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात वीजबिल न भरणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडीत केला जाणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात पाच हजार कोटींची थकबाकी

सगळ्यात जास्त थकबाकीदार कृषिपंप ग्राहक सोलापूर मंडळात असून याची संख्या तीन लाख ६८ हजार असून थकीत व चालू बिलाची एकूण थकबाकी पाच हजार ३३८ कोटी रुपये आहे. अन्य मंडळांच्या तुलनेत सोलापूर विभाग थकबाकीत अव्वल आहे.

दरम्यान, सांगली मंडळात दोन लाख ४० हजार कृषिपंप ग्राहकांकडे एकूण थकबाकी एक हजार ५७६ कोटी रुपये आहे. बारामती मंडळात एक लाख ८८ कृषिपंप ग्राहकांकडे दोन हजार ३७९ कोटींची थकबाकी आहे. सातारा मंडळात एक लाख ८४ हजार कृषिपंप ग्राहकांकडे एक हजार कोटी तर कोल्हापूर मंडळात एक लाख ४६ हजार कृषीपंपाकडे एक हजार ९६२ कोटी आणि पुणे ग्रामीण मंडळात एक लाख २० हजार कृषीपंपाकडे एक हजार १३८ कोटींची थकबाकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT