Mask-Making
Mask-Making 
महाराष्ट्र

असा तयार करा घरच्या घरी मास्क!

सकाळवृत्तसेवा

जुने बनियन, टी-शर्ट आणि रुमाल वापरून मास्क तयार करता येऊ शकतो. असा मास्क ७० टक्क्यांपर्यंत परिणामकारक ठरतो असे तज्ज्ञांचे मात आहे. 

केंद्र सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांच्या कार्यालयाने एक विस्तृत माहितीपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्याद्वारे घरात सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या वस्तूंपासून मास्क कसा तयार करायचा याबाबतच्या सूचना केल्या आहेत.

असा बनवा मास्क...

  • शंभर टक्के सुती कापडापासून तयार केलेले दोन थर असलेले मास्क सर्जिकल मास्कच्या तुलनेत ७० टक्क्यांपर्यंत परिणामकारक ठरतात.
  • हे मास्क कोरोनाच्या विषाणूहून पाच पट लहान आकाराचे सूक्ष्म कण रोखू शकतात
  • सुती कापडामुळे श्वास घेण्यात अडचण येत नाही, तसेच हे कापड सर्वत्र सहजासहजी मिळू शकते
  • हे मास्क स्वच्छ धुवून पुन्हा वापरता येतात

मास्क का वापरावा?

  • बाधा झालेल्या व्यक्तीमुळे हवेत पसरलेले लहान थेंब आपल्या श्वसनयंत्रणेत जाण्यापासून रोखण्यात मास्कमुळे मदत होते
  • गर्दीच्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे
  • उष्णता, अल्ट्राव्हायोलेट लाईट, पाणी, साबण आणि अल्कोहल आदींचा उपयोग करून स्वच्छ केलेल्या मास्कमुळे विषाणू श्वसनयंत्रणेत जाण्याची शक्यता कमी होते

मास्कच्या मर्यादा
घरी तयार केलेल्या या मास्कमुळे विषाणूपासून पूर्णपणे संरक्षण होत नसले तरी संसर्गाचे प्रमाण घटण्यास मदत होते 

असा स्वच्छ करा मास्क
मास्क दररोज गरम पाणी आणि साबणाने स्वच्छ धुणे आवश्यक आहे. मास्क न धुता वापरू नये. 

मास्कचा वापर वाढण्यास मदत
या पद्धतीचे मास्क कुठलिही व्यक्ती किंवा एनजीओ तयार करू शकते. देशातील मास्क वापरण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी अशा प्रकारच्या मास्कची निर्मिती फायदेशीर ठरते

विश्लेषण काय सांगते 

  • एकूण लोकसंख्येपैकी ५० टक्के लोकांनी मास्कचा वापर केला तर उरलेल्या फक्त ५० टक्के लोकांनाच विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असते
  • एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के नागरिकांनी मास्कचा वापर केल्यास विषाणूचा उद्रेक तातडीने थांबविता येऊ शकतो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT