Malegaon Magistrate orders Muslim man to offer 5 times Namaaz for 21 days plant 2 trees as punishment  
महाराष्ट्र बातम्या

Malegaon News : २१ दिवस ५ वेळा नमाज, अन् दोन…; मारहाण प्रकरणात मालेगाव कोर्टानं दिली आगळी वेगळी शिक्षा

सकाळ डिजिटल टीम

रस्त्यावर झालेल्या अपघातानंतर मारहाण केल्याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव दंडाधिकारी न्यायालयाने एका ऑटोरिक्षा चालकाला आगळी वेगळी शिक्षा दिली आहे. या प्रकरणात आरोपील दोन झाडे लावण्याची तसेच पुढील २१ दिवस दिवसातून पाच वेळा नमाज अदा करण्याची शिक्षा सुनावली आहे.

रऊफ खान उमर खान हा 30 वर्षीय व्यक्ती ऑटोरिक्षा चालक असून, याच्या ऑटोने 2010 मध्ये मालेगाव शहरातील एका अरुंद गल्लीत थांबलेल्या दुचाकीला धडक दिली होती. तक्रारदाराने त्याला याबाबत विचारणा केल्यानंतर खानने त्याला मारहाण केली. त्यानंतर तक्रारीनंतर खानवर भारतीय दंड संहितेच्या कलम 323 , 325 , 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी कलम 323 अन्वये खान दोषी असल्याचा न्यायदंडाधिकार्‍यांनी निर्णय दिला, तर उर्वरित गुन्ह्यांमधून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. खानला दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करण्याच्या अटीवर तुरुंगवास आणि दंड न करता निर्दोष मुक्त करण्यात आले.

न्यायदंडाधिकारी, तेजवंत संधू यांनी याबाबत मत मांडताना सांगितले की, प्रोबेशन ऑफ ऑफेन्डर्स ऍक्ट, 1958 च्या कलम 3 ने दंडाधिकार्‍यांना सूचना किंवा योग्य ताकीद दिल्यानंतर सोडण्याचा अधिकार दिला आहे, जेणेकरून त्याने गुन्हा पुन्हा करू नये. परंतु यावेळी न्यायालयाने असेही तर्क दिला की केवळ समज पुरेशी होणार नाही, दोषीला समज लक्षात राहणेही आवश्यक आहे. जेणेकरून तो त्या गुन्ह्याची पुनरावृत्ती करू नये.

यावर बोलताना न्यायदंडाधिकारी यां नी निरीक्षण नोंदवले की, माझ्या मते, वाजवी समज दिला म्हणजे आरोपीने गुन्हा केला आहे हे लक्षात ठेवावे. आरोपी दोषी सिद्ध झाला आणि तो गुन्हा पुन्हा करू नये हे लक्षात ठेवावे जेणेकरून याची पुनरावृत्ती होऊ नये.

हेही वाचा - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

या निर्णयानुसार खान यांना गुन्हा घडलेल्या सोनापुरा मशिदीच्या आवारात दोन झाडे लावायची आहेत आणि झाडांची निगा राखायची आहे. तसेच इस्लामिक धर्माचे पालन करणारा माणूस असूनही तो नियमित नमाज अदा करत नसल्याची कबुली आरोपीने सुनावणीदरम्यान दिली होती.

यानंतर आरोपी हा धर्माभिमानी मुस्लिम आहे आणि त्याने कबूल केले आहे की 5 वेळा नमाज अदा करणे बंधनकारक असताना, वेळेअभावी तो अशी नमाज अदा करत नाही. हे लक्षात घेऊन न्यायालयाने दोषीला पुढील 21 दिवस नियमितपणे दिवसातून पाच वेळा नमाज अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT