ममता बॅनर्जी बुधवारी मुंबईत शरद पवारांच्या भेटीला  sakal
महाराष्ट्र बातम्या

ममता बॅनर्जी बुधवारी मुंबईत शरद पवारांच्या भेटीला

उद्धव ठाकरे यांची भेट होणार नाही, विरोधकांची एकत्रित मोट बांधण्याची तयारी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बुधवारी (ता. १) दुपारी तीन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी भेट घेणार आहेत. त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार होत्या. परंतु ठाकरे सध्या रुग्णालयात असल्यामुळे त्यांची भेट होणार नाही,’’ अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

ममता बॅनर्जी मुंबईच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. एक डिसेंबरला त्या उद्योजकांनाही भेटण्याची शक्यता आहे. या भेटीत त्या पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी उद्योजकांना आवाहन करतील. मुख्यमंत्री ठाकरे आणि ममता यांची भेट होणार नाही. परंतु शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे ममता यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेसने नुकत्याच बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीस ममता हजर नव्हत्या. काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांची एकत्रित मोट बांधण्यास ममतांचा विरोध आहे. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील या दुराव्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे. या संदर्भात मलिक म्हणाले, ‘‘पवार आणि ममता बॅनर्जी यांची ही सदिच्छा भेट आहे. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात दुरावा होत असेल तर तो कसा दूर होइल, अशीच राष्ट्रवादीची भूमिका असेल. सर्व विरोधक एकसंध आले पाहिजेत. विरोधकांची एकत्रित मोट बांधण्यासाठी पवार प्रयत्नशील आहेत. काँग्रेसशिवाय विरोधकांची आघाडी होऊ शकत नाही, अशी भूमिका पवार यांनी मांडलेली आहे. शिवसेना काँग्रेससोबत येऊ शकते. तर तृणमूल आणि काँग्रेसही एकत्रित येतील.’’

दरम्यान, आगामी २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक होईल. त्यापूर्वी पवार यांनी भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधण्यास सुरवात केली आहे. त्या अनुषंगाने पवार यांनी मागील जून महिन्यात दिल्लीत विरोधकांची बैठकही बोलावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना मिळणार 2,000 रुपये! पीएम किसानचा 24 वा हप्ता कधी जमा होणार?

Breaking: स्टोक्स-मॅक्युलमची सत्ता संपली! इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकपदी स्टीफन फ्लेमिंगची नियुक्ती, कर्णधारपदी... ; ECB चा मोठा निर्णय

School Chicken Biryani: शाळकरी मुलांना मिळणार चवदार चिकन बिर्याणी! तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये पाच जणांचे बळी, प्रशासनाला आली जाग

Dharavi Redevelopment: मुंबईतील हिरवळीवर पालिकेचा घाला! धारावी पुनर्विकासासाठी ८,००० झाडांवर कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT